AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या जुन्या बाईकवर जनता फिदा, विक्रीत Raider, Pulsar आणि Apache वर केली मात

बाजारात अनेक बाईक आहेत. आता तर फीचर्स आणि अनेक तंत्रज्ञानासह आधुनिक बाईक रस्त्यावर धावत आहेत. विविध डिझाईनच्या बाईक मनाला भुरळ घालतात. त्या ग्राहकांचे लक्ष वेधतात. या ताज्या दमाच्या बाईकला नवीन जुन्या दुचाकीने टफ फाईट दिली आहे. या बाईकवर ग्राहक फिदा झाले आहेत.

या जुन्या बाईकवर जनता फिदा, विक्रीत Raider, Pulsar आणि Apache वर केली मात
जुनं ते सोनं, या बाईकवर जनता फिदा
| Updated on: Mar 22, 2024 | 4:45 PM
Share

बाजारात कितीही प्रकारच्या नवीन डिझाईन आणि फीचर्सच्या बाईक येऊ द्या. पण काही बाईक जुनी असली तरी त्यांचा बाजारातील दबदबा कमी होत नाही. ग्राहक याच बाईकची मागणी करतात. काही उत्पादन बंद झालेल्या बाईक सेकंड हँड बाजारात सर्वाधिक विक्री होत असल्याचे दिसून आले आहे. काही लोकांना ते जुनं डिझाईन आवडते. काहींना मायलेज तर काहींसाठी बाईकची कमी किंमत महत्वाची असते. भारतीय बाजारात अशीच एक बाईक म्हणजे हिरो स्प्लेंडर प्लस. तिचा जलवा आजही 22 वर्षे झाली तरी कायम आहे. हिरो स्प्लेंडर प्लस प्रत्येक महिन्याच्या विक्रीत टॉपवर असते. केवळ 100cc इंजिन आणि साधारण डिझाईन असले तरी या दुचाकीची जोरदार विक्री होते.

इतर बाईकवर केली मात

या बाईकने फेब्रुवारी 2024 च्या विक्रीत टीव्हीएस रेडर, बजाज पल्सर आणि टीव्हीएस अपाचे सारख्या बाजारातील नामी खेळाडूंना धूळ चारली. फेब्रुवारी 2024 मध्ये हिरो स्प्लेंडरच्या 2,77,939 युनिटची विक्री झाली. विक्रीत ही बाईक पहिल्या क्रमांकावर होती. तर 1,42,763 युनिट्ससह विक्रीत होंडा शाईनने दुसरा क्रमांक पटकावला. तर बजाज पल्सर 1,12,544 युनिट विक्रीसह तिसऱ्या क्रमांकावर होती. हिरोच्या एचएफ डीलक्सची विक्री पण जोमात होती. या बाईकच्या गेल्या महिन्यात एकूण 76,138 युनिटची विक्री झाली. टीव्हीएस रेडरचे 42,063 युनिट विक्री झाले. तर अपाचे या बाईकचे 34,593 युनिट विक्री झाले.

हिरो स्प्लेंडर जबरदस्त मायलेज

हिरो स्प्लेंडरला लोक मायलेजमुळे सर्वाधिक पसंती देतात. ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 60-65 किलोमीटर मायलेज देते. कंपनीने बाईकला 97.2cc सिलेंडर एअर कूल्ड इंजिन दिले आहे. ते 8.02PS ची जास्तीतजास्त पॉवर आणि 8.05Nm चे सर्वोत्तम टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये 4 स्पीड गिअरबॉक्स मिळतात.

मिळतात हे फीचर्स

या बाईकमध्ये ड्युएल पॉड इंस्ट्रूमेंट क्लस्टर, अलॉय व्हील्स, फ्यूल इंजेक्शन सिस्टम, i3S इंजिन स्टार्ट-स्टॉप आणि ट्यूबलेस टायर सारखे फीचर्स मिळतात. स्प्लेंडरमध्ये 9.8-लिटरची फ्यूल टँक मिळते. या बाईकचे वजन 112 किलोग्रॅम आहे.

अहिल्यानगरमध्ये भाजप - राष्ट्रवादीचा दणदणीत विजय
अहिल्यानगरमध्ये भाजप - राष्ट्रवादीचा दणदणीत विजय.
मुंबई प्रभाग 199 मध्ये ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा विजय
मुंबई प्रभाग 199 मध्ये ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा विजय.
निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईत लागलेले निकाल आले समोर
निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईत लागलेले निकाल आले समोर.
Pune Muncipal Result Updates : रवींद्र धंगेकरांच्या पत्नीचा पराभव!
Pune Muncipal Result Updates : रवींद्र धंगेकरांच्या पत्नीचा पराभव!.
मुंबईत MIM चा विजयी पंजा. प्रभाग क्रमांक 139 मधून शबाना शेख यांचा विजय
मुंबईत MIM चा विजयी पंजा. प्रभाग क्रमांक 139 मधून शबाना शेख यांचा विजय.
पवारांच्या तुतारीचा आवाज बंद!अजितदादांच्या घड्याळाचे काटेही उलटे फिरले
पवारांच्या तुतारीचा आवाज बंद!अजितदादांच्या घड्याळाचे काटेही उलटे फिरले.
वसंतदादा पाटलाचं पणतू हर्षवर्धन पाटील विजयी!
वसंतदादा पाटलाचं पणतू हर्षवर्धन पाटील विजयी!.
अनेक पालिकांचे निकाल लागले, मुंबईच्या निकालाची प्रतीक्षा! काय आहे कल?
अनेक पालिकांचे निकाल लागले, मुंबईच्या निकालाची प्रतीक्षा! काय आहे कल?.
'डॅडी' अरूण गवळी यांची हवा, पण दोन्ही मुलींचा दारूण पराभूत
'डॅडी' अरूण गवळी यांची हवा, पण दोन्ही मुलींचा दारूण पराभूत.
नवी मुंबईत प्रभाग क्रमांक 8 मध्ये गणेश सपकाळ यांचा दणदणीत विजय
नवी मुंबईत प्रभाग क्रमांक 8 मध्ये गणेश सपकाळ यांचा दणदणीत विजय.