AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2026, MI vs UP : मुंबई इंडियन्सकडे युपीचा हिशोब करण्याची संधी, शनिवारी लोळवणार?

UP Warriorz Women vs Mumbai Indians Women : युपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा गेल्या सामन्यात पराभव केला होता. त्यामुळे मुंबई शनिवारी या पराभवाची परतफेड करणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

WPL 2026, MI vs UP : मुंबई इंडियन्सकडे युपीचा हिशोब करण्याची संधी, शनिवारी लोळवणार?
WPL 2026 MIW vs UPW PreviewImage Credit source: WPL/Bcci
| Updated on: Jan 17, 2026 | 12:45 AM
Share

वूमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतील चौथ्या मोसमातील 10 व्या मोसमात गतविजेता मुंबई इंडियन्स आपला पाचवा सामना हा शनिवारी 17 जानेवारीला खेळणार आहे. मुंबईसमोर या मोसमात सलग दुसऱ्यांदा यूपी वॉरियर्सचं आव्हान असणार आहे. युपीने गेल्या सामन्यात सलग 2 सामने जिंकणाऱ्या मुंबईला पराभूत करत या मोसमतील विजयाचं खातं उघडलं होतं. त्यामुळे आता मुंबईकडे गेल्या पराभवाची परतफेड करुन तिसरा सामना जिंकून विजयी ट्रॅकवर परतण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला यूपी वॉरियर्स पुन्हा मुंबईला पराभूत करण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबई आणि यूपीचा हा चौथ्या मोसमातील एकूण पाचवा सामना असणार आहे. दोन्ही संघांची या मोसमातील सुरुवात पराभवाने झाली. मुंबईने पहिल्या पराभवानंतर जोरदार मुसंडी मारत सलग 2 सामने जिंकले. तर सलग 3 सामने गमावणाऱ्या युपीने मुंबईला गुरुवारी 15 जानेवारीला पराभूत करत विजयी हॅट्रिक करणापासून रोखलं आणि पहिला विजय साकारला. युपीने मुंबईवर 7 विकेट्सने विजय मिळवला. युपीने 162 धावांचं आव्हान हे 11 बॉलआधी 7 विकेट्स राखून पूर्ण केलं. त्यानंतर आता 48 तासांच्या आत हे दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने असणार आहेत. त्यामुळे पलटण हिशोब करणार की पुन्हा युपी वॉरियर्स पुन्हा मैदान मारणार याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

युपी विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना कधी?

युपी विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना शनिवारी 17 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.

युपी विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना कुठे?

युपी विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे.

युपी विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

युपी विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

युपी विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?

युपी विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपद्वारे सामना मोबाईल-लॅपटॉपवर पाहता येईल.

युपी वॉरियर्स सर्वात शेवटी

दरम्यान युपी वॉरियर्स पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या आणि सर्वात शेवटी विराजमान आहे. युपी 1 विजय आणि 2 गुंणासह पाचव्या क्रमांकावर आहे. तर मुंबई 4 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. मुंबईप्रमाणे गुजरात जायंट्सचेही 4 गुण आहेत. मात्र गुजरातपेक्षा नेट रनरेट भारी असल्याने मुंबईने दुसऱ्या स्थानी आहे.

अहिल्यानगरमध्ये भाजप - राष्ट्रवादीचा दणदणीत विजय
अहिल्यानगरमध्ये भाजप - राष्ट्रवादीचा दणदणीत विजय.
मुंबई प्रभाग 199 मध्ये ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा विजय
मुंबई प्रभाग 199 मध्ये ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा विजय.
निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईत लागलेले निकाल आले समोर
निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईत लागलेले निकाल आले समोर.
Pune Muncipal Result Updates : रवींद्र धंगेकरांच्या पत्नीचा पराभव!
Pune Muncipal Result Updates : रवींद्र धंगेकरांच्या पत्नीचा पराभव!.
मुंबईत MIM चा विजयी पंजा. प्रभाग क्रमांक 139 मधून शबाना शेख यांचा विजय
मुंबईत MIM चा विजयी पंजा. प्रभाग क्रमांक 139 मधून शबाना शेख यांचा विजय.
पवारांच्या तुतारीचा आवाज बंद!अजितदादांच्या घड्याळाचे काटेही उलटे फिरले
पवारांच्या तुतारीचा आवाज बंद!अजितदादांच्या घड्याळाचे काटेही उलटे फिरले.
वसंतदादा पाटलाचं पणतू हर्षवर्धन पाटील विजयी!
वसंतदादा पाटलाचं पणतू हर्षवर्धन पाटील विजयी!.
अनेक पालिकांचे निकाल लागले, मुंबईच्या निकालाची प्रतीक्षा! काय आहे कल?
अनेक पालिकांचे निकाल लागले, मुंबईच्या निकालाची प्रतीक्षा! काय आहे कल?.
'डॅडी' अरूण गवळी यांची हवा, पण दोन्ही मुलींचा दारूण पराभूत
'डॅडी' अरूण गवळी यांची हवा, पण दोन्ही मुलींचा दारूण पराभूत.
नवी मुंबईत प्रभाग क्रमांक 8 मध्ये गणेश सपकाळ यांचा दणदणीत विजय
नवी मुंबईत प्रभाग क्रमांक 8 मध्ये गणेश सपकाळ यांचा दणदणीत विजय.