T20 World Cup : एका जागेसाठी जोरदार चुरस, वॉशिंग्टनच्या जागी आयुषला संधी मिळणार?
India vs New Zealand : ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याला दुखापतीमुळे एकदिवसीय आणि टी 20i मालिकेतील एकूण 7 सामन्यांना मुकावं लागलंय. सुंदरच्या जागी टी 20i सीरिजमध्ये रवी बिश्नोई याचा समावेश करण्यात आलाय. त्यामुळे रवी सुद्धा सुंदरच्या जागी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संभाव्य दावेदार आहे, असं म्हणू शकतो.

भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. या मालिकेला 21 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. भारताची ही टी 20i मालिकेआधी सर्वात शेवटची मालिका असणार आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादव भारताच नेतृत्व करणार आहे. तर अक्षर पटेल उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याला दुखापतीमुळे या टी 20i मालिकेतून बाहेर व्हावं लागलंय. त्यामुळे सुंदर टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत फिट होणार की नाही? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुंदर लवकर दुखापतीतून सावरला नाही तर त्याला वर्ल्ड कप स्पर्धेला मुकावं लागू शकतं. त्यामुळे सुंदरच्या जागी कुणाला संधी मिळू शकते? हे जाणून घेऊयात.
टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारत आणि श्रीलंककडे आहे. या 10 व्या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे सुंदरच्या कमबॅकबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अशात सुंदरला मुकावं लागल्यास त्याच्या जागी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सुंदरच्या कुणाचा समावेश केला जाऊ शकतो? हे समजून घेऊयात.
वॉशिंग्टन सुंदर याला काय झालं?
वॉशिंग्टन सुंदर याला न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडेत दुखापत झाली. सुंदरला बॉलिंग करताना बडोद्यात पोटाजवळ दुखापत झाली. त्यामुळे शुबमनला वनडेसह टी 20i मालिकेतूनही बाहेर व्हावं लागलंय.
आयुष बडोनी
दिल्लीचा कर्णधार आयुष बडोनी याचा सुंदरच्या जागी एकदिवसीय मालिकेत समावेश केला आहे. ऑलराउंडर आयुषची भारतीय संघात निवड होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. आयुष सुंदरप्रमाणे ऑफ स्पिनर आहे. तसेच आयुष फिनिशिंग टच देण्यात माहिर आहे. आयुषला आयपीएलमधून टी 20 क्रिकेट खेळण्याचा चांगला अनुभव आहे.
नितीश कुमार रेड्डी
ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याची सातत्याने टी 20i मालिकेत निवड केली जातेय. नितीश ऑलराउंडर आहे. नितीशला आपली छाप पाडता आलेली नाही. मात्र नितीशचं ऑलराउंडर असणं ही त्याची जमेची बाजू आहे. त्यामुळे सुंदरबाबत नको तसं झालं तर त्याच्या जागी या दोघांपैकी कुणाला एकाला संधी मिळणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
