AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चौथ्या तिमहीत TVS ची रेकॉर्डब्रेक विक्री, 4 पट नफ्यासह 319 कोटींची कमाई

आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत ऑटोमोबाईल कंपन्यांच्या विक्रीत जोरदार वाढ झाली आहे. अनेक कंपन्यांनी या तिमाहीत विक्रमी विक्री नोंदवली आहे.

चौथ्या तिमहीत TVS ची रेकॉर्डब्रेक विक्री, 4 पट नफ्यासह 319 कोटींची कमाई
TVS Ntorq 125
| Edited By: | Updated on: Apr 29, 2021 | 8:57 AM
Share

मुंबई : आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत ऑटोमोबाईल कंपन्यांच्या विक्रीत जोरदार वाढ झाली आहे. अनेक कंपन्यांनी या तिमाहीत विक्रमी विक्री नोंदवली आहे. टीव्हीएस मोटर कंपनीने (TVS Motor Company) म्हटले आहे की, 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत त्यांचा एकूण निव्वळ नफा जवळपास चार पट वाढून 319.19 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या जोरदार विक्रीमुळे हे शक्य झालं आहे. (TVS Motor earns four times profit in fourth quarter of FY, company earns Rs 319.19 crore)

कंपनीने वर्ष 2019-20 च्या जानेवरी-मार्च या तिमाहीत 81.84 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. टीव्हीएस मोटरने नियामक नोटीसमध्ये म्हटले आहे की, चौथ्या तिमाहीत ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल वाढून 6,131.90 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. जो आर्थिक वर्ष 2019-20 च्या याच कालावधीत 4,104.71 कोटी रुपये इतका होता. टीव्हीएस मोटर कंपनीने म्हटले आहे की, मार्चमध्ये देशांतर्गत बाजारात त्यांनी 2,02,155 दुचाकींची विक्री केली आहे. यासह बीएसई वर स्टॉक टीव्हीएसचा शेअर 16.74 टक्क्यांनी वाढून 661.10 रुपये झाला आणि एनएसई वर तो 17.25 टक्क्यांनी वाढून 664 रुपये झाला.

कंपनीने म्हटले आहे की पुनरावलोकनाच्या कालावधीत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांची दुचाकी आणि तीन चाकी वाहनांची विक्री 9.28 लाख युनिट्सवर पोहोचली आहे. हीच आकडेवारी 2019-20 च्या चौथ्या तिमाहीत विक्री झालेल्या 6.33 लाख युनिट्सपेक्षा 47 टक्क्यांनी अधिक आहे.

607.50 कोटी रुपयांचा नफा

संपूर्ण 2020-21 या आर्थिक वर्षात कंपनीला 607.50 कोटी रुपयांचा नफा झाला आहे, जो आर्थिक वर्ष 2020 मधील 646.80 कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याच्या तुलनेत 6.07 टक्क्यांची घसरण दर्शवतो. कंपनीने म्हटले आहे की, मार्च 2021 मध्ये संपलेल्या वर्षात निर्यातीसह एकूण दुचाकी आणि तीन चाकी वाहनांची विक्री 2019-20 च्या 30.52 लाख युनिट्सच्या तुलनेत निर्यातीसह 32.63 लाख युनिट्सवर पोहोचली आहे.

TVS Apache RTR 160 लाँच

मार्चमध्ये टीव्हीएस मोटर कंपनीने आपल्या मोटारसायकल मॉडेल अपाचे आरटीआर 160 4V चे 2021 व्हेरिएंट लाँच केले होते, या बाईकची दिल्लीत एक्स शोरूम किंमत 1,07,270 रुपये इतकी आहे. कंपनीने शेअर बाजाराला सांगितले की 159.7 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन असलेले हे मॉडेल दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. त्याच्या डिस्क ब्रेक व्हेरिएंटची किंमत 1,10,320 रुपये आणि ड्रम ब्रेक व्हेरिएंटची किंमत 1,07,270 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

इतर बातम्या

बजाज पल्सर Dagger Edge एडिशन बाईक लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

55 हजारांहून कमी किंमतीत Bajaj आणि Hero च्या दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या बाईक, तुमच्यासाठी बेस्ट कोणती?

Two Wheelers च्या विक्रीत ‘या’ गाड्यांनी मोडले सर्व रेकॉर्ड्स, Splendor आणि Activa चा धुमाकूळ

(TVS Motor earns four times profit in fourth quarter of FY, company earns Rs 319.19 crore)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.