इलेक्ट्रिक कार खरेदी करताय; निर्णयापूर्वी जाणून घ्या लाभांसोबत तोट्याचं गणित

वाढत्या पेट्रोल दरापासून सुटका, प्रदूषणात घट होण्यामुळे पर्यावणाचं संवर्धन यासारखे लाभ सांगितले जातात. मात्र, इलेक्ट्रिक कार खरेदीचे तोटे (Disadvantages of buying electric car) असू शकतात

इलेक्ट्रिक कार खरेदी करताय; निर्णयापूर्वी जाणून घ्या लाभांसोबत तोट्याचं गणित
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 9:43 PM

नवी दिल्लीः जगभरात इलेक्ट्रिक कार (Electric car) खरेदीचा डंका आहे. जागतिक कार निर्मिती कंपन्यांत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठी स्पर्धा लागली आहे. ऑडी, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडिज सारख्या वाहन निर्मिती कंपन्या इलेक्ट्रिक कार उत्पादन क्षेत्रात डेरेदाखल झाल्या आहेत. पर्यावरण पूरकतेला चालना देण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) कडून आर्थिक प्रोत्साहन योजना जारी करण्यात आल्या आहेत. वाढत्या पेट्रोल दरापासून सुटका, प्रदूषणात घट होण्यामुळे पर्यावणाचं संवर्धन यासारखे लाभ सांगितले जातात. मात्र, इलेक्ट्रिक कार खरेदीचे तोटे (Disadvantages of buying electric car) असू शकतात? इलेक्ट्रिक कार खरेदीमुळे भविष्यात नेमक्या कोणच्या संभाव्य अडचणींना सामोरे जावे लागू शकतं हे देखील निश्चितचं जाणून घ्यायलाचं हवं. तुम्हाला इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी अनुरुप निर्णयापर्यंत पोहोचता येईल.

1. चार्जिंग स्टेशनसाठी धावाधाव-

भारतात इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी ग्राहकांमध्ये जागरुकता वाढत आहे. सरकार आणि खासगी कंपन्या इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची संख्या वाढविण्याचा विचार करीत आहे. मात्र, चार्जिंग स्टेशनची उभारणी करणं मोठं आव्हानात्म काम आहे. सध्या भारतात चार्जिंग स्टेशनची संख्या तुलनेने कमी आहे. मात्र, इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ नोंदविली गेली आहे.

2. चार्जिंग साठी अधिक वेटिंग

सर्वसाधारणपणे वाहनांत इंधन भरण्यासाठी कमी कालावधी लागतो. रांगा अधिक नसल्यास 2-3 मिनिटांत पेट्रोल किंवा डिझेल भरू शकतात. इलेक्ट्रिक वाहनांचा विचार केल्यास कारच्या चार्जिंगासाठी तुलनेने अधिक वेळ लागतो. सध्या आधुनिक तंत्राचा अवलंब केलेली वाहनं बाजारात आहेत. त्यामध्ये कमी वेळात तत्काळ चार्जिंग होऊ शकते. नुकतीच लाँच झालेली व्हॉल्वो 40 मिनिटांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. पेट्रोल-डिझेलच्या तुलनेच इलेक्ट्रिक कारसाठी अद्यापही 40 मिनिटे लागतात.

3. महागडा बॅटरी पॅक

इलेक्ट्रिक कारमध्ये बॅटरी पॅक सर्वात महागडा पार्ट असतो. बॅटरी पॅक नादुरुस्त झाल्यास बदलावयाच्या असल्यास लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागू शकतो.

4. कारची रेंज

पेट्रोल कारची टाकी फुल्ल केल्यानंतर 400-500 किलोमीटरचं अंतर सहज कापू शकतो. आतापर्यंत आलेल्या इलेक्ट्रिक कारमध्ये रेंजची समस्या आहे. टाटा नेक्सॉन ईव्ही बाबत 400 किलोमीटरचा दावा करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षाहून कारची रेंज निश्चितच कमी आहे. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात तुम्हाला निश्चितच इलेक्ट्रिक कार खरेदीबाबत विचार करायलाच हवा.

5. ई-वेस्ट आणि प्रदूषणात वाढ

इलेक्ट्रिक कारमुळे प्रदूषणात घट होण्याचा दावा केला जातो. इलेक्ट्रिक कारमधून कार्बन उत्सर्जन होत नसले तरी बॅटरीतून पर्यावरणाला हानीकारक वायूंचे उत्सर्जन निश्चितपणे होते. बॅटरीचे रिसायकलिंग करण्याची सध्या कोणतीही व्यवस्था अस्तित्वात नाही.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.