Yamaha च्या शानदार स्पोर्ट्सबाईकच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या सर्व व्हेरिएंट्सच्या नव्या किंमती

Yamaha Motor India ने नुकत्याच लाँच केलेल्या YZF-R15 V4 मोटरसायकलच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. नवीन अपडेटेड स्पोर्ट्स बाईक सप्टेंबर 2021 मध्ये भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी सादर करण्यात आली होती.

Yamaha च्या शानदार स्पोर्ट्सबाईकच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या सर्व व्हेरिएंट्सच्या नव्या किंमती
Yamaha R15 V4
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 11:54 AM

मुंबई : Yamaha Motor India ने नुकत्याच लाँच केलेल्या YZF-R15 V4 मोटरसायकलच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. नवीन अपडेटेड स्पोर्ट्स बाईक सप्टेंबर 2021 मध्ये भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी सादर करण्यात आली होती. मोटरसायकलची मूळ किंमत 1.67 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी निश्चित करण्यात आली होती. दरम्यान, कंपनीने आता सर्व व्हेरिएंटच्या किंमतीत 3,000 रुपयांनी वाढ केली आहे. (Yamaha ZF R15 V4 gets its first price hike since launch in september 2021)

Yamaha R15 V4 च्या प्राइस लिस्टबद्दल बोलायचे झाल्यास R15 V4 मेटॅलिक रेडची किंमत 1,70,800 रुपये, R15 V4 डार्क नाइटची किंमत 1,71,800 रुपये, R15 V4 रेसिंग ब्लूची किंमत 1,75,800 रुपये ठेवण्यात आली आहे. R15 V4 मेटलची किंमत 1,80,800 रुपये आणि R15 V4 मॉन्स्टर एनर्जी मोटोजीपी व्हेरियंटची किंमत 1,82,800 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. नवीन मोटरसायकलमध्ये दरवाढीशिवाय इतर कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

Yamaha ZF-R15 V4 मध्ये नवीन अपडेट्स

Yamaha ZF-R15 V4 मोटारसायकल पाच वेगवेगळ्या रंगात येते. यामाहाने भारतात न्यू जनरेशन मॉडेल अनेक अपडेट्ससह सादर केले आहे. नवीन मोटारसायकलला ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TCS) तसेच क्विक शिफ्टरसह अनेक अपग्रेडेड फीचर्स मिळतात. सहसा ही वैशिष्ट्ये फक्त हाय आणि प्रीमियम सुपरबाईक्समध्येच दिसतात.

Yamaha ZF-R15 V4 चे फीचर्स

या मोटारसायकलच्या इतर महत्वाच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, त्यात अपसाइड डाउन फ्रंट फोर्क, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, यामाहा मोटरसायकल कनेक्ट आणि गिअर शिफ्ट इंडिकेटर आहे. यासह, YZF-R1 हून प्रेरित एक नवीन LCD इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ट्रॅक आणि स्ट्रीट मोडचा समावेश आहे. जे बाईकला अधिक स्टायलिश बनवतात. मोटारसायकलला 17-इंच अलॉय व्हील्स मिळतात जे एकाच डिस्कशी जोडले जातात.

Yamaha ZF-R15 V4 चं इंजिन

यामाहाच्या या स्पोर्ट्स मोटरसायकलला 155 सीसी इंजिन देण्यात आले आहे, जे सिंगल सिलिंडर आहे आणि त्याला लिक्विड कूल आणि 4-व्हॉल्व्ह इंजिन मिळते. हे इंजिन 10,000 rpm वर जास्तीत जास्त 18.4 PS ची पॉवर आणि 7,500 rpm वर 14.2 Nm पीक टॉर्क निर्माण करते. फ्यूल-इंजेक्टेड मोटर 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली आहे.

Yamaha ZF-R15 V4 चं डिझाईन

यामाहाच्या या मोटारसायकलच्या एक्सटीरियरबद्दल बोलायचे झाले तर त्यात पूर्ण नवीन डिझाईन देण्यात आले आहे. हे डिझाईन Yamaha YZF-R7 पासून प्रेरित दिसते. कंपनीने ही मोटारसायकल फ्रंटला अशा प्रकारे डिझाईन केली आहे की, त्याला मोठ्या बाईकचे स्वरूप आणि उत्तम एरोडायनामिक्स देता येईल.

इतर बातम्या

Yezdi Adventure मोटारसायकल लवकरच भारतात लाँच होणार, रॉयल एनफील्डला टक्कर

2022 Hyundai Creta फेसलिफ्टचा ग्लोबल डेब्यू, जाणून घ्या भारतात कधी लाँच होणार?

Mahindra लवकरच देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार, जाणून घ्या कारमध्ये काय असेल खास

(Yamaha ZF R15 V4 gets its first price hike since launch in september 2021)

Non Stop LIVE Update
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.