AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sensex and Nifty | अर्थसंकल्पामुळे शेअर बाजारात मोठी उलथापालथ, सेन्सेक्स 900 अंकांनी उसळला, निफ्टी थेट 17600 अंकावर

निफ्टी थेट 17,600 अंकांच्या पार पोहोचला आहे. तर मुंबईच्या भांडवली (Sensex)  बाजारात म्हणजेच सेन्सेक्सने 900 अंकाची उसळी घेतली आहे. सरकारने शेती, उद्योग, व्यापार तसेच शिक्षण आणि इतर क्षेत्रांसाठी भरगोस मदत दिली.

Sensex and Nifty | अर्थसंकल्पामुळे शेअर बाजारात मोठी उलथापालथ, सेन्सेक्स 900 अंकांनी उसळला, निफ्टी थेट 17600 अंकावर
SENSEX AND NIFTY
| Edited By: | Updated on: Feb 01, 2022 | 1:27 PM
Share

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत आर्थिक वर्ष 2022-23 साठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी केंद्र सरकारने वेगवेगळ्या क्षेत्रांच्या विकासासाठी भरीव अशी मदतीची घोषणा केलीय. सरकारच्या या घोषणांचा भांडवली बाजारावर (stock Market) सकारात्मक परिणाम झाला आहे. निफ्टी थेट 17,600 अंकांच्या पार पोहोचला आहे. तर मुंबईच्या भांडवली (Sensex)  बाजारात म्हणजेच सेन्सेक्सने 900 अंकाची उसळी घेतली आहे. सरकारने शेती, उद्योग, व्यापार तसेच शिक्षण आणि इतर क्षेत्रांसाठी भरगोस आर्थिक तरतूद केली. तसेच सरकारने डिजिटलायझेशनसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले याच कारणामुळे सध्या भांडवली बाजारामध्ये तेजी आल्याचे पाहायला मिळत आहेत. अर्थसंकल्प संसदेत मांडण्याआधीही भांडवली बाजारात उसळी आली होती.

भांडवली बाजारात तेजी

आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाचा परिणाम भांडवली बाजारावर झाला. आज शेअर बाजारात बजेटचे सकारात्मक पडसाद उमटले. राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच निफ्टी तसेच मुंबई शेअर बाजार म्हणजेच सेनेस्क वधारल्याचे पाहायला मिळाले. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर निफ्टी 17,600 अंकांच्या पार गेला. तर सेन्सेक्सला 900 अंकाची उसळी मिळाली असून बाजारात मोठी उलाढाल झाली. सध्या मुंबई शेअर बाजार 58,548.63 अंकांवर स्थिरावला आहे. तर निफ्टी 17408.40 अकांवर आहे. सध्या बाजार बंद न झाल्यामुळे यामध्ये आणखी बदल होण्याची शक्यता आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये काय आहे ?

दरम्यान, यावेळी अर्थसंकल्पात आगामी निवडणुकांना लक्षात ठेवून भरघोस आणि आकर्षक अशा घोषणा करण्यात आल्या. महिलांसाठी तीन नव्या योजना सुरु करण्यात येणार आहेत. तसेच 2 लाख अंगणवाड्यांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केला जाईल. यावर्षी अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी आयकर स्लॅबसंदर्भात कोणताही बदल होणार नसल्याची जाहीर केलं. वर्च्युअल करन्सीतून होणाऱ्या कमाईवर 30 टक्के कर लावण्यात आला आहे. आर्थिक वर्षे 2022-23 चा अंदाजित खर्च 39.45 लाख  कोटी रुपये असेल.2023 पर्यंत 25 हजार किलोमीटरचा महामार्ग बांधला जाणार आहे. तसेच 3 वर्षात नव्या 400 बुलेट ट्रेन सुरु करण्यात येतील. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच देशात डिजिटल विद्यापीठाची स्थापना केली जाईल. येत्या 2 वर्षात देशात 80 लाख घरं तयार केली जाणार आहेत. शाळांमध्ये प्रत्येक वर्गात tv बसवला जाणार आहे. शेतकऱ्यांना डिजिटल बनवण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच शेतकऱ्यांना एमएसपीच्या माध्यमातून 2.37 कोटी रुपये दिले जाणार आहेत.

इतर बातम्या :

Budget 2022 | स्टार्टअपसाठी नाबार्डतर्फे मदत, पिकांसाठी किसान ड्रोन, सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन, अर्थसंकल्पात शेतीसाठी काय ?

Budget 2022 | तिजोरीत गंगाजळीः मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्कातून सरकार मालामाल, एक लाख कोटींची कमाई

BUDGET 2022: 60 लाख नव्या नोकऱ्या, 400 वंदे भारत ट्रेन; बजेटची ओपनिंग धडाकेबाज घोषणांनी!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.