Budget 2022: यंदाच्या अर्थसंकल्पात 25 वर्षाची ब्ल्यूप्रिंट, जीडीपी 9.2% टक्के राहणार; निर्मला सीतारामण यांचे बजेट भाषण सुरू

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बजेट सादर केला आहे. संसदेत त्यांच्या बजेट भाषणास सुरुवात झाली आहे. बजेट भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी देशवासियांना दिला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात 25 वर्षाची ब्ल्यूप्रिंट आहे.

Budget 2022: यंदाच्या अर्थसंकल्पात 25 वर्षाची ब्ल्यूप्रिंट, जीडीपी 9.2% टक्के राहणार; निर्मला सीतारामण यांचे बजेट भाषण सुरू
यंदाच्या अर्थसंकल्पात 25 वर्षाची ब्ल्यूप्रिंट, जीडीपी 9.2% टक्के राहणार; निर्मला सीतारामण यांचे बजेट भाषण सुरू
भीमराव गवळी

|

Feb 01, 2022 | 11:37 AM

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी बजेट (Budget 2022) सादर केला आहे. संसदेत त्यांच्या बजेट भाषणास सुरुवात झाली आहे. बजेट भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी देशवासियांना दिला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात 25 वर्षाची ब्ल्यूप्रिंट आहे. विकास हाच या बजेटचा हेतू असून शेतकरी, महिला आणि तरुणांना केंद्रस्थानी ठेवून हा बजेट तयार करण्यात आल्याचं निर्मला सीतारामण यांनी सांगितलं. तसेच देशाच जीडीपी पुढील आर्थिक वर्षात 9.2 टक्के राहणार असल्याचं सांगून अर्थव्यवस्थेला बुस्टर मिळणार असल्याचं सीतारामण यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या दोन वर्षापासून भारतासह (india) देश कोरोना संकटाशी झुंज देत असताना सीतारामण यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा करून देशवासियांना मोठा दिलासा दिला आहे.

निर्मला सीतारामण यांचा हा चौथा बजेट आहे. बरोबर सकाळी 11 वाजता त्यांनी संसदेत बजेट भाषणास सुरुवात केली. यावेळी त्यांनी या अर्थसंकल्पात पुढील 25 वर्षाची ब्ल्यूप्रिंट असल्याचं म्हटलं आहे. बजेटमध्ये महिला, तरुण आणि शेतकऱ्यांवर फोकस करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वाचं कल्याण व्हावं, हे मोदी सरकारचं धोरण आहे. देशाची अर्थव्यवस्था गती पकडत आहे. त्यामुळे आम्ही विकास हाच केंद्रबिंदू ठेवला आहे, असं सीतारामण म्हणाल्या.

400 वंदे भारत ट्रेन चालवणार

येत्या तीन वर्षात देशात 400 नव्या वंदेभारत ट्रेन चालवण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच या तीन वर्षात पीएम गती शक्ती कार्गो टर्मिनल तयार करण्यात येणार आहे. 8 नव्या रोपवेची निर्मिती करण्यात येणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

16 लाख तरुणांना नोकऱ्या

अर्थसंकल्पातून शेतकरी. तरुणांचा फायदाच होणार आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत देशातील 16 लाख तरुणांना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत, अशी घोषणा त्यांनी केली.

एलआयसीचा आयपीओ येणार

यावेळी त्यांनी एलआयसीचा आयपीओ येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. एअर इंडियाची गुंतवणूक पूर्ण झाली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. पुढील आर्थिक वर्षात आर्थिक वृद्धी दर 9.2 टक्के राहणार आहे. अर्थव्यवस्थेतील हा आकडा सर्वात मोठा आहे, असंही त्या म्हणाल्या.

अभ्यासक्रमात फार्मिंग कोर्स

देशभरात अभ्यासक्रमात फार्मिंग कोर्सचा समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व राज्यांना प्रोत्साहित केलं जाणार आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित हे कोर्स असतील.

संबंधित बातम्या:

Budget 2022: देशाला मजबूत आर्थिक धोरणांची गरज, जुमलेबाजी नको; बजेटपूर्वीच काँग्रेसची टीका

Budget 2022 : मनमोहन Vs मोदी सरकार, कोणाच्या काळात करदात्याला दिलासा, कोणामुळे रिकामा झाला खिसा?

अर्थव्यवस्थेची दिशा ठरवणारा अर्थसंकल्प आज होणार सादर, कुठल्या क्षेत्राला मिळणार दिलासा याकडे सर्वांचे लक्ष…

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें