Union budget 2023 : देशाच्या सुरक्षा बजेटमध्ये वाढ; चीनसमोर भारताची स्थिती कुठं?

चीनच्या तुलनेत भारताचा सुरक्षा बजेट खूप कमी आहे. चीनचा सुरक्षा बजेट २२९ बिलीयन डॉलरच्या जवळपास आहे. त्यात भारताचा सुरक्षा बजेट ७२.६ बिलीयन आहे.

Union budget 2023 : देशाच्या सुरक्षा बजेटमध्ये वाढ; चीनसमोर भारताची स्थिती कुठं?
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 8:47 PM

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री (finance minister) निर्मला सीतारामण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवरील खर्चात १२.९५ टक्के वाढ केली. गेल्या वर्षी सुरक्षेचा अर्थसंकल्पावर होणार खर्च ५ लाख २५ हजार कोटी रुपये होता. यंदा ५ लाख ९४ हजार कोटी रुपये सुरक्षा व्यवस्थेवरील खर्च अपेक्षित आहे. देशाच्या सुरक्षेपुढं पाकिस्तान आणि चीन कुठं आहे, याचा आपण विचार करणार आहोत. अर्थमंत्री निर्मला सीतारामण (nirmala sitaraman) यांनी १ फेब्रुवारी २०२३ रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यात त्यांनी सुरक्षा व्यवस्थेवरील खर्चात वाढ केली.

२०२३-२४ च्या सुरक्षा बजेट ५ लाख ९४ हजार कोटी रुपयांचा आहे. गेल्या वर्षी हा सुरक्षा बजेट ५ लाख २५ हजार कोटी रुपये होता. बजेटमध्ये १ लाख ६२ हजार कोटी रुपये शस्त्र खरेदीसाठी ठेवण्यात आलेत. यामधून हत्यार, विमान, युद्धनौका हा खर्च केला जाईल. एकूण सुरक्षा बजेट ५ लाख ९४ हजार कोटी रुपयांचा आहे.

यावर्षी सुरक्षा बजेटमध्ये १२.९५ टक्के वाढ करण्यात आली आहे. यातून हत्यारं, फायटर जेट, पानडुबी आणि टँकर तयार करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सीमावादावरून चीन आणि भारत यांच्यात तसेच पाकिस्तान आणि भारत यांच्यात वाद होत असतात. अशावेळी चीनच्या सुरक्षा बजेट आणि पाकिस्तानचा सुरक्षा बजेट यांचा तुलनात्मक विचार केला जातो. कारण दोन्ही देशांच्या सीमेवरून नेहमी तणाव असतो.

चीनच्या तुलनेत भारताचा सुरक्षा बजेट खूप कमी आहे. चीनचा सुरक्षा बजेट २२९ बिलीयन डॉलरच्या जवळपास आहे. त्यात भारताचा सुरक्षा बजेट ७२.६ बिलीयन आहे. याचा अर्थ चीनचा सुरक्षा बजेट भारताच्या तीनपट आहे.

पाकिस्तानचा सुरक्षा बजेट ७.५ बिलीयन डॉलर आहे. याचा अर्थ पाकिस्तानच्या ९ पट सुरक्षा बजेट भारताचा आहे. गेल्या काही वर्षात मोदी सरकार सुरक्षा क्षेत्रात मेक इन इंडियाला प्राधान्य देत आहे. यामुळं सरकारचा सुरक्षा व्यवस्थेवरील खर्च वाढत आहे. सेनेच्या आधुनिकीकरणावरही खर्चात वाढ होत आहे. सुरक्षा पेंशनसाठी १ लाख ३८ हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत.

१९६५ मध्ये देशाचा सुरक्षा बजेट ३५ कोटी रुपये होता. त्यावेळी ११५ कोटी रुपये सुरक्षा व्यवस्थेवर खर्च करण्यात आले होते. पाकिस्तानी पानडुबीमुळं सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. एकंदरित पाकिस्तान आणि चीनच्या सीमाभागातील खुरापतीमुळं देशाला सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी लागली.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.