AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरदारांची बल्ले बल्ले; आता खिसा नाही कापणार, 4 लाखांच्या उत्पन्नावर छदाम सुद्धा देऊ नका, नवीन कर रचना काय?

Budget 2025, Taxpayers Income Tax Slab : अखेर मोदी सरकार एकदाचे करदात्यांना पावले. त्यांना आता 4 लाखांचे उत्पन्न करमुक्त असेल. तर सवलत आणि सूट जर घेतली नाही तर 12 लाखांपर्यंतच्या कमाईवर नोकरदारांना छदाम पण भरावा लागणार नाही.

नोकरदारांची बल्ले बल्ले; आता खिसा नाही कापणार, 4 लाखांच्या उत्पन्नावर छदाम सुद्धा देऊ नका, नवीन कर रचना काय?
मोदी सरकारचा मोठा धमाका
| Updated on: Feb 01, 2025 | 12:59 PM
Share

अखेर मोदी सरकार एकदाचे करदात्यांना पावले. त्यांना आता 4 लाखांचे उत्पन्न करमुक्त असेल.  12 लाखांपर्यंतच्या कमाईवर नोकरदारांना छदाम पण भरावा लागणार नाही. अनेक जण या Tax Limit विषयी संभ्रमित आहे. किती कमाईवर त्यांना कर द्यावा लागणार, किती उत्पन्नावर कर द्यावा लागणार नाही, याची चर्चा होत आहे. 4 लाख रुपयांपर्यत आयकर भरावा लागणार नाही.  तर पुढे जे काही कर द्यावा लागेल, तो  सवलत, सूटच्या माध्यमातून पुन्हा वसूल करता येईल.  अर्थात ही करमुक्तता केवळ नवीन कर प्रणाली स्वीकारणाऱ्या करदात्यांना मिळेल.

4 लाखांपर्यंत कर मुक्ती

गेल्या वर्षी देशात अर्थसंकल्प सादर झाल्यावर करदात्यांनी सर्वाधिक बोटं मोडली होती. तोंड वाकडं केली होती. कारण त्यांना महागाई, कर्जाचे हप्ते आणि कराच्यो ओझ्याची चिंता होती. गेल्या वर्षी 3 लाखांपर्यंतचे उत्पन्न कर मुक्त होते. तर यंदा नवीन कर स्लॅब जाहीर केले आहे. त्यानुसार आता 4 लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर छदाम पण भरावा लागणार आहे. पण ही घोषणा केवळ नवीन कर प्रणाली नुसार कर जमा करणाऱ्या करदात्यांनाच मिळेल.

मग कुणाला मिळेल द्यावा लागेल कर?

कर सवलत, सूट घेणाऱ्या करदात्यांना म्हणजे जुन्या कर रचनेप्रमाणे आयटीआर भरणाऱ्यांना कर द्यावा लागू शकतो. नवीन कर प्रणालीनुसार आयटीआर भरणाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना आयकर भरावा लागणार नाही. ज्यांनी कर्ज घेतले आहे आणि गुंतवणूक केली आहे. त्यांना या स्लॅबचा मोठा फायदा होईल. त्यांची मोठी रक्कम वाचणार आहे. तज्ज्ञांच्या मते वाचलेला पैसा पुन्हा बाजारात फिरेल, तो बँकेत गुंतवल्या जाईल अथवा नोकरदार वर्ग ही बचत बाजारात खर्च करेल. त्यामुळे सुस्तावलेल्या अर्थव्यवस्थेला आपोआप गती मिळेल आणि विकसीत भारतासाठी मोठा वृद्धी दर गाठणे सोपे होईल.

कशी असेल नवीन कररचना

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केल्याप्रमाणे 0-12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कर द्यावा लागणार नाही. 12-16 लाखापर्यंतच्या कमाईवर 15 टक्के आयकर द्यावा लागेल. 16 ते 20 लाख उत्पन्नावर 20 टक्के आयकर तर 20 लाख ते 24 लाख उत्पन्नावर 25 टक्के कर द्यावा लागेल. पण यामधील काही बारकावे तुम्हाला समजून घ्यावे लागेल.

तज्ज्ञांच्या मते, 4 लाख रुपयांपर्यत आता देशातील करदात्यांना कर द्यावा लागणार नाही. तर 4 ते 8 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर  5 टक्के कर द्यावा लागेल. तर 8 लाख ते 12 लाखांपर्यंतची कमाईवर 10 टक्के कर द्यावा लागेल. गृहकर्ज वा इतर काही सवलतींआधारे हा कर सुद्धा करदात्यांना वाचवता येईल.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप