Budget 2022 : डिजिटल बजेट ते सर्वाधिक अवधीचं अर्थसंकल्पीय भाषण; यंदाच्या बजेटची ठळक वैशिष्ट्ये

अर्थसंकल्प पटलावर मांडण्यापूर्वी सदस्यांना वितरित करण्यासाठी अर्थसंकल्पाच्या प्रती छापल्या जातात. अर्थसंकल्पाच्या मोजक्या प्रतींची प्रत्यक्ष छपाई केली जाईल. कागदाचा अधिकाधिक वापर टाळून हरित अर्थसंकल्पाची कल्पना पुढे आणली गेली आहे.

Budget 2022 : डिजिटल बजेट ते सर्वाधिक अवधीचं अर्थसंकल्पीय भाषण; यंदाच्या बजेटची ठळक वैशिष्ट्ये
Budget-2022
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 10:51 PM

नवी दिल्ली– केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प (Budget 2022) सादर करतील. कोविड प्रकोपामुळे मंदावलेल्या अर्थजगताची चाकं बजेटमुळं गतिमान होण्याची शक्यता आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी (Health Budget) सरकारकडून अधिक तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी देखील अर्थसंकल्पात वाढीव निधीची तरतूद करण्यात आली होती. दरम्यान,यंदाचे अर्थसंकल्प पूर्णपणे डिजिटल (Digital Budget) असण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्प पटलावर मांडण्यापूर्वी सदस्यांना वितरित करण्यासाठी अर्थसंकल्पाच्या प्रती छापल्या जातात. अर्थसंकल्पाच्या मोजक्या प्रतींची प्रत्यक्ष छपाई केली जाईल. कागदाचा अधिकाधिक वापर टाळून हरित अर्थसंकल्पाची कल्पना पुढे आणली गेली आहे. मात्र, अर्थसंकल्प सादर करतेवेळीच या सर्व गोष्टींचा खुलासा होणार आहे. नव्या स्वरुपात सादर होणारा अर्थसंकल्प नेमका केव्हा मांडणार, वेळेचं गणित याविषयी सर्वकाही जाणून घेऊया-

Budget 2022: तारीख आणि वेळ

केंद्रीय अर्थमंत्री 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. ‘फर्स्टपोस्ट’च्या वृत्तानुसार, अर्थसंकल्पीय भाषण अंदाजित1.30 तास ते 2 तासांदरम्यान असू शकते. दरम्यान, भाषण वाचनाचा कालावधीला अधिकही असू शकतो. वर्ष 2020 मधील 2 तास 40 मिनिटांपर्यंतचे अर्थसंकल्पीय भाषण आजवरचे सर्वाधिक अवधीचे भाषण ठरले होते.

Budget 2022: अर्थसंकल्प कुठे पाहू?

तुम्ही अर्थसंकल्प 2022 भाषण पाहू किंवा ऐकू इच्छित असल्यास तुमच्यासाठी एकाधिक पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही थेट संसद टीव्हीद्वारे पाहू शकतात. सध्या सर्वच खासगी वाहिन्या अर्थसंकल्पीय भाषणाचे थेट प्रसारण करतात. त्यामुळे हा पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध असेल. जाहिराती टाळायच्या असतील तर दूरदर्शन वरुन प्रसारित होणारे अर्थसंकल्प पाहू शकता.

Budget 2022: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तपशील:

अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने होईल. 31 जानेवारीला राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सदनांना संबोधित करतील. दोन सत्रात होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात अर्थसंकल्प मांडला जाईल. 11 फेब्रुवारीला सत्र समाप्त होईल. दुसरे सत्र 14 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीदरम्यान असेल.

आर्थिक सर्वेक्षण

अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण प्रकाशित केले जाते. यंदाच्या वर्षी 31 जानेवारीला आर्थिक सर्वेक्षण मांडले जाईल. आर्थिक सर्वेक्षणात देशाच्या वर्तमान आर्थिक स्थितीबाबत सविस्तर माहिती दिलेली असते. वर्तमान अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने आणि त्यावरील उपाय आर्थिक सर्वेक्षणात मांडलेले असतात.

Home Loan Tax Rebate: स्वप्नातील घराला कर सवलतीचा नजराणा, 5 लाखांपर्यंत मिळू शकते कर सवलत

Budget 2022 : कृषी क्षेत्राच्या नजरेतून अर्थसंकल्प ; सरकारच्या भूमिकेवरच सर्वकाही अवलंबून..!

Budget 2022: यंदाच्या बजेटमध्ये सरकार राष्ट्रीय आरोग्य अभियानाची व्याप्ती वाढवणार? जाणून घ्या महत्वाचे मुद्दे!

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.