Budget 2024 | शेतकऱ्यांना आता वर्षाला 6 हजारांपेक्षा पण जास्त पैसे मिळणार का? सरकार खुशखबर देणार का?

Budget 2024 | सरकारकडून अर्थसंकल्प 2024 मध्ये शेतकऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना 6 हजार रुपये वार्षिक दिले जातात. त्याता आता आणखी किती हजाराची वाढ होऊ शकते? निवडणूक वर्ष असल्याने नोकरी, घर याकडे सरकारचा जास्त फोकस असेल.

Budget 2024 | शेतकऱ्यांना आता वर्षाला 6 हजारांपेक्षा पण जास्त पैसे मिळणार का? सरकार खुशखबर देणार का?
PM Kisan Yojana
Follow us
| Updated on: Jan 29, 2024 | 2:01 PM

Budget 2024 | अर्थसंकल्प 2024 सादर व्हायला आता फक्त 3 दिवस बाकी उरले आहेत. निवडणूक वर्ष असल्याने बजेटच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. सरकारच सर्व लक्ष अन्न, घर, नोकरी आणि शेतकऱ्यावर असेल. हे अंतरिम बजेट आहे, त्यामुळे रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी आणि महागाई रोखण्याच्या उपायोजना जनतेला अपेक्षित आहेत. बजेटमध्ये सरकार या बद्दल मोठ्या घोषणा करु शकते. रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकारला काही महत्त्वाची पावल उचलावी लागतील. दरवर्षी लाखो युवा वर्कफोर्सचा भाग बनतायत. त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण हे बजेटमध्ये सरकारसमोर आव्हान असेल.

कोरोनानंतर खाण्या-पिण्याच्या पदार्थांच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. खासकरुन डाळी आणि तेलाच्या किंमती. घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. सरकारने दोन-अडीच महिन्यापूर्वी ही किंमत कमी केली होती. पण हे पुरेस नाहीय. ही किंमत आणखी कमी होणं आवश्यक आहे. आम आदमीच्या इनकमचा जास्त भाग खाण्या-पिण्यावर खर्च होतोय. त्यामुळे खाद्य-पदार्थांच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी ठोस उपायोजना हवी. अर्थमंत्री त्या दृष्टीने काही पावल उचलतील अशी अपेक्षा आहे.

नोकरीच्या संधी वाढवण्यासाठी प्रोडक्शन लिंक्ड इनसेंटिवचा विस्तार का आवश्यक?

रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकारने पावल उचलली पाहिजेत. युनियन बजेट त्यासाठी मोठी संधी आहे. यावर्षी लाखो युवक वर्कफोर्सचा भाग बनलेत. त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी वाढवण हे सरकारसमोरच मोठ आव्हान आहे. एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, सरकारने मॅन्युफॅक्चरिंगवर जास्त लक्ष केंद्रीत केलय. त्यामुळे रोजगार वाढण्यास मदत झालीय. रोजगाराची संधी वाढवण्यासाठी प्रोडक्शन लिंक्ड इनसेंटिव (PLI) स्कीमचा विस्तार आवश्यक आहे. सर्वाधिक लेबरचा वापर होतो, त्या सेक्टर्सना या स्कीमतंर्गत आणण्याची गरज आहे.

शेतकरी सन्मान निधी योजनेची रक्कम किती हजारने वाढणार?

अर्थतज्ज्ञांच्या मते 1 फेब्रुवारीला काही महत्त्वपूर्ण घोषणा होऊ शकतात. शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना 6 हजार रुपये दिले जातात. ती रक्कम 50 टक्क्याने वाढवून वार्षिक 9 हजार रुपये केली जाऊ शकते.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....