सोनं आजही महागलं, चांदीला मोठी झळाळी, बजेटनंतर मात्र दर पडणार? वाचा काय घडतंय बजेटच्या पार्श्वभूमीवर

खूप काळापासून सोन्याची इम्पोर्ट ड्युटी कमी करावी तसच जीएसटीतही सुधार करावी अशी मागणी व्यापारी करतायत. | Gold rates

सोनं आजही महागलं, चांदीला मोठी झळाळी, बजेटनंतर मात्र दर पडणार? वाचा काय घडतंय बजेटच्या पार्श्वभूमीवर
एंजल ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्या मतानुसार बजेटनंतर सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण होऊ शकते. सध्या सोन्यावर इम्पोर्ट ड्युटी खूप जास्त असल्यामुळे आणि त्यात पुन्हा जीएसटी लागत असल्यानं सोन्याचे वाढलेत.
Follow us
| Updated on: Jan 29, 2021 | 8:48 PM

मुंबई: देशाचं बजेट आता काही तासांवर येऊन ठेपलंय आणि सोन्याच्या भावाचं (Gold rates) काय होणार असा सर्वात मोठा प्रश्न ग्राहक आणि सोन्याचे व्यापारी असा दोघांनाही पडलाय. तर त्याचं उत्तर आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एंजल ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्या मतानुसार बजेटनंतर सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण होऊ शकते. सध्या सोन्यावर इम्पोर्ट ड्युटी खूप जास्त असल्यामुळे आणि त्यात पुन्हा जीएसटी लागत असल्यानं सोन्याचे वाढलेत. (Gold and silver rates price in India)

सध्या इम्पोर्ट ड्युटी 12.5 टक्के एवढी तर जीएसटी 3 टक्के एवढी आहे. खूप काळापासून सोन्याची इम्पोर्ट ड्युटी कमी करावी तसच जीएसटीतही सुधार करावी अशी मागणी व्यापारी करतायत. ती कदाचित ह्या बजेटमध्ये पूर्ण केली जाईल असं जाणकारांना वाटतं. इम्पोर्ट ड्युटी कमी केली तर सोन्याच्या दरात मोठी घसरण निश्चित मानली जातेय.

किती टक्के होऊ शकते इम्पोर्ट ड्युटी?

2019 सालात मोठ्या प्रमाणात सोन्याची स्मगलिंग पकडली गेली होती. इम्पोर्ट ड्युटी जास्त असल्याचाही तो परिणाम होता. पुन्हा स्मगलिंग होऊ नये म्हणून बजेटमध्ये अर्थमंत्री सीतारामन इम्पोर्ट ड्युटी कमी करत 6 ते 7 टक्क्यावर आणू शकतात असा विश्वास जाणकार व्यक्त करतायत.

केवायसीतही सुधारणा होणार?

केवायसीबाबत सरकारनं स्पष्टीकरण देऊनही संभ्रम कायम आहे. आधी दोन लाखापर्यंत तुम्ही सोनं खरेदी केलं तर आधार, पॅनकार्ड लागत नव्हतं. पण अलिकडेच बातमी आलीय की अनेक ठिकाणी ह्या दोन्हीची पुर्तता करावी लागतेय. दोन लाख रुपयांच्या वर खरेदी केली तर आधार, पॅनकार्डची गरज आहे. एकंदरीतच ह्या सगळ्या प्रक्रियेत सुसुत्रता आणली जाणार असं एक्सपर्ट सांगतायत. त्यामुळे सोने खरेदीदार आणि व्यापारी दोन्हींचीही किचकिच कमी होईल.

आज सोन्याचे दर पुन्हा वाढले

आज देशाचं आर्थिक सर्वेक्षण सादर केलं गेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. सराफा बाजारात सोन्याला 319 रुपयांची तेजी होती तर बाजारात प्रती 10 ग्रामसाठी 49 हजार रुपयांपेक्षा जास्त मोजावे लागले. बाजार प्रती 10 ग्रामला 49 हजार 393  वर बंद झाला.चांदीला चमकलीसोन्यापेक्षाही आज चांदीच्या दरात मोठी वाढ पहायला मिळाली. 2 हजार 370 रुपयांची वाढ नोंदवली गेलीय. 68 हजार रुपये प्रति किलो असलेली चांदी आता सत्तर हजाराकडे वाटचाल करतेय. तुमच्या शहरात पाचशे ते हजार रुपयांपर्यंत दरात फरक पडू शकतो.

संबंधित बातम्या:

(Gold and silver rates price in India)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.