AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात सातत्याने घसरण, खरेदीचा विचार करताय? तर, वाचा आजचे दर…

Gold Silver price today: सोन्याच्या किंमती सलग सहाव्या दिवशी घसरल्याचं दिसून आलं आहे.

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात सातत्याने घसरण, खरेदीचा विचार करताय? तर, वाचा आजचे दर…
gold silver price
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Jan 29, 2021 | 8:42 AM
Share

मुंबई : सोन्या-चांदीच्या भावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण झाल्याचं समोर आलं आहे. अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे भारतातील मौल्यवान धातूच्या किंमती घसरल्या. मुंबईत 10 ग्रॅम सोन्याचा दर गुरवारच्या तुलनेत 200 रुपयांची घसरण होऊन 48 हजार 800 वर पोहोचला आहे. गेल्या 10 दिवसांच्या सोन्याच्या दराचा अभ्यास केल्यास 200 रुपयांचा भाव कमी असल्याचं दिसून येते. (Gold Silver price today on 29 January 2021 Maharashtra Mumbai Pune latest rate and updates )

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अमेरिकन डॉलरच्या घसरणीमुळे सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. स्पॉट सोन्याचे 0.4 टक्क्यांच्या घसरणीसह दर प्रति औंस 1,839.45 डॉलर होता. तर चांदीचा भाव 0.56 टक्के वाढीसह म्हणजेत 0.14 डॉलरची वाढ होऊन 25.29 डॉलर प्रति औंस एवढा राहिला.

?मुंबईतील सोने चांदीचे दर

22 कॅरेट सोने : 47800 रुपये 24 कॅरेट सोने : 48,800 रुपये चांदीचे दर : 66500 रुपये (प्रतिकिलो)

?पुणे सोने चांदीचे दर

22 कॅरेट सोने : 47, 800 रुपये 24 कॅरेट सोने : 48, 800 रुपये चांदीचे दर : 65900 रुपये (प्रतिकिलो)

?नाशिक सोने चांदीचे दर

22 कॅरेट सोने : 47800 रुपये 24 कॅरेट सोने : 48,800 रुपये चांदीचे दर : 66000 रुपये (प्रतिकिलो)

?नागपूर सोने चांदीचे दर

22 कॅरेट सोने : 47, 800 रुपये 24 कॅरेट सोने : 48, 800 रुपये चांदीचे दर : 66000 रुपये (प्रतिकिलो)

सोने प्रतितोळा 63 हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता

देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारांपर्यंत पोहोचू शकतो, असे काही अर्थतज्ज्ञांचे मत आहे. तसेच आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी व्याजदर कमी केले होते. त्याशिवाय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी मोदी सरकारकडून पॅकेजही जाहीर करण्यात आलेत. तसेच दर कपातीला 2019 च्या उत्तरार्धात सुरू झाल्याने अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित झाले आहेत. यंदाच्या वर्षात देशांतर्गत सोन्याचे भाव हे कमीत कमी 60 हजारांपर्यंत पोहोचू शकतात, असा एक कयास बांधला जात आहे. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये याचा भाव हा 2200 डॉलर इतका होऊ शकतो. मात्र यासाठी रुपयामध्ये स्थिरता असणे गरजेचे आहे. मात्र जर रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला तर याबाबतचा अंदाज पुढे-मागे होऊ शकतो. (Gold Silver price today on 29 January 2021 Maharashtra Mumbai Pune latest rate and updates )

संबंधित बातम्या:

Gold Price Today : सोन्याच्या भावांमध्ये मोठी घसरण, जाणून घ्या आजचे ताजे भाव

  Silver Rate Today : सोने-चांदीत गुंतवणुकीची सुवर्णसंधी, दरात पुन्हा घसरण, सध्याचे दर काय?

(Gold Silver price today on 29 January 2021 Maharashtra Mumbai Pune latest rate and updates)

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...