AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरीब, मध्यम वर्गावर लक्ष्मीची कृपा राहो; बजेट सत्रापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शुभ संकेत, विकसीत भारताविषयी मोठे वक्तव्य

PM Narendra Modi Before Budget Session 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसर्‍या कार्यकाळातील हे पहिले संपूर्ण बजेट सादर होत आहे. त्यापूर्वी पंतप्रधानांनी गरीब, मध्यम वर्गावर लक्ष्मीची कृपा राहो, असे वक्तव्य करून शुभ संकेत दिले आहे.

गरीब, मध्यम वर्गावर लक्ष्मीची कृपा राहो; बजेट सत्रापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शुभ संकेत, विकसीत भारताविषयी मोठे वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Updated on: Jan 31, 2025 | 11:14 AM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसर्‍या कार्यकाळातील (Modi 3.0 Budget 2025) संपूर्ण अर्थसंकल्प सादर होत आहे. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बजेट सादर करतील. आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बिगूल वाजणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधानांनी गरीब, मध्यम वर्गावर लक्ष्मीची कृपा राहो, असे वक्तव्य करून शुभ संकेत दिले आहे. विकसीत भारतासाठी केंद्र सरकार मिशन मोडवर असल्याचे ते म्हणाले. आता विकसीत भारताचे वारू उधळल्याचे संकेत त्यांनी दिले.

लक्ष्मी मातेची कृपा राहो

“आज बजेट सत्राच्या प्रारंभी मी समृद्धीची देवी, लक्ष्मी मातेला नमन करतो. अशा वेळी लक्ष्मी मातेचे स्मरण करणे ही आपली जुनी परंपरा आहे. लक्ष्मी माता ही सिद्धी देते. आई लक्ष्मी गरीब, मध्यम वर्गावर विशेष कृपा ठेवेल,” असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे वक्तव्य बजेटपूर्वीच शुभ संकेत तर नाहीत ना, अशी चर्चा होत आहे. लक्ष्मीची कृपा खरंच मध्यमवर्ग, गरीबांवर होईल, का अशी चर्चा होत होती. गेल्या काही वर्षात महागाईने हा वर्ग सर्वाधिक भरडला गेला आहे. त्यातच करांचे ओझे कमी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्याचवेळी पंतप्रधानांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

विकसीत भारताकडे अजून एक पाऊल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बजेटमध्ये विकसीत भारताचा चेहरा दिसले, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी देशाच्या समृद्धीसाठी लक्ष्मी मातेला नमन केले. तिसऱ्या कार्यकाळात सरकारचे मिशन मोडवर असल्याचे ते म्हणाले. सर्वांचा विकास हेच आपल्या सरकारचे मिशन असल्याचे ते म्हणाले. आमचा देश तरुणांचा आहे. आपल्याकडे तरुणांची शक्ती आहे. आज जी 20-25 वर्षांचे तरुण आहेत. ते जेव्हा 45-50 वर्षांचे होतील, तेव्हा ते या विकसीत भारताचे सर्वात मोठे लाभार्थी असतील असे मोदी म्हणाले.

तिसऱ्या कार्यकाळातील पहिले पूर्ण बजेट

केंद्रीय अर्थसंकल्पीय सत्रापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आपल्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिले पूर्ण बजेट असल्याचे सांगितले. 2047 मध्ये विकसीत भारताचा संकल्प पूर्ण होईल. अनेक ऐतिहासिक बिलांवर या सत्रामध्ये चर्चा होईल. Innovation, नाविन्य हीच आपल्या आर्थिक धोरणांचा आधार आहे. सरकार रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मवर लक्ष्य देत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.