AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget Stock Picks: अर्थसंकल्पापूर्वी ‘हे’ 10 शेअर्स खरेदी करा, मालामाल व्हा!

Budget 2025 Stock Picks: तुम्हाला अर्थसंकल्पापूर्वी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही पुढील शेअर्सवर तज्ज्ञांच्या सल्ल्याने पैसे लावू शकतात. डेटा पॅटर्नचा शेअर सुमारे 38 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. असेच 10 शअर्स जाणून घेऊया.

Budget Stock Picks: अर्थसंकल्पापूर्वी ‘हे’ 10 शेअर्स खरेदी करा, मालामाल व्हा!
कमाईचा मोका
| Edited By: | Updated on: Jan 30, 2025 | 3:52 PM
Share

केंद्रीय अर्थसंकल्प 2025, 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पात सरकार मोठ्या घोषणा करते, ज्या सर्व क्षेत्रांशी संबंधित असतात. सरकारच्या घोषणेनंतर त्या-त्या क्षेत्रांशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी असते. त्यामुळे शेअर बाजारातील तज्ज्ञ नेहमीच अर्थसंकल्पापूर्वी अशा शेअर्सची नावे सुचवतात, ज्यात वाढ होण्याची शक्यता असते.  अर्थसंकल्प 2025 पूर्वी ब्रोकरेज कंपनी जेफरीजने 10 शेअर्सची नावे सुचवली आहेत. जी वेगवेगळी क्षेत्रे आहेत. ‘ब्रोकरेज’ म्हणते की, अर्थसंकल्पापूर्वी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही पुढील शेअर्समध्ये करू शकता. चला तर मग जाणून घेऊया.

शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातून 2024 हे वर्ष दोन भागांत पाहायला हवे, असे जेफरीज यांचे म्हणणे आहे. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने युतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर गुंतवणूकदारांच्या काही चिंता वाढल्याने शेअर बाजारावर दबाव निर्माण झाला होता. पण त्याचवेळी महाराष्ट्र निवडणुकीच्या जबरदस्त निकालाने गुंतवणूकदारांची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे.

ब्रोकरेजच्या शिफारस केलेले 10 शेअर्स

1. L & T 2. HAL 3. SIEMENS 4. ABB 5. BHARAT ELECTRONICS 6. CUMMINS 7. THEMAX 8. BHEL 9. KEL INDUSTRIES 10. DATA PATTERNS

मात्र, यंदाचा अर्थसंकल्प निर्णायक ठरणार असल्याचे मानले जात आहे. कारण सरकारी भांडवली खर्चावर भर दिला जातो. जेफरीज यांच्या मते, HAL ची ऑर्डर बुक मजबूत आहे, सरकारचेही कंपनीवर लक्ष आहे. त्यामुळे यासंदर्भातील घोषणा अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे.

ब्रोकरेजने 10 शेअर्समध्ये जास्तीत जास्त 38 टक्के टार्गेट दिले आहे. डेटा पॅटर्नचा शेअर सुमारे 38 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. हा शेअर सध्या 2500 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे.

L & T, HAL, सिमेन्स, एबीबी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, कमिन्स, थर्मॅक्स, भेल, केईआय इंडस्ट्रीज आणि डेटा पॅटर्न्स या जेफरीजच्या स्टॉक नावांची शिफारस करण्यात आली आहे.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कंपनीच्या शेअरने गेल्या वर्षभरात 27 टक्के परतावा दिला आहे. अर्थसंकल्पात सरकारने संरक्षणासाठी केलेल्या अधिक तरतूदीचा परिणाम या कंपनीच्या शेअर्सवर दिसून येतो. आता गुंतवणूक केल्यास काही आठवड्यांत चांगली कमाई होऊ शकते.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ही कंपनी विमाने आणि हेलिकॉप्टरची निर्मिती करते. यासोबतच लढाऊ विमानांचे असेंबलिंग आणि देखभालीचे कामही करते. या कंपनीने अशी अनेक विमाने बनवली आहेत, जी पूर्वी केवळ आयात केली जात होती. याचे उत्तम उदाहरण म्हणजे तेजस लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट. मोदी सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत संरक्षण उपकरणे देशातच तयार करण्यावर भर देण्यात आला आणि त्याचा फायदा हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कंपनीला झाला आहे. कंपनीचे ऑर्डर बूक खूप मजबूत आहे.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....