आर्थिक सर्व्हे म्हणजे काय रे भाऊ?; वाचा लेखाजोखा!

केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल सादर करण्यात येतो. येत्या 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. (What is Economic Survey and why is it important?)

आर्थिक सर्व्हे म्हणजे काय रे भाऊ?; वाचा लेखाजोखा!
निर्मला सीतारमण

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल सादर करण्यात येतो. येत्या 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. 2021-2022 या आर्थिक वर्षासाठीचा हा अर्थसंकल्प असून त्यापूर्वी उद्या शनिवारी आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल संसदेत सादर केला जाणार आहे. हा आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल काय आहे? तो का महत्त्वाचा आहे? यावर टाकलेला हा प्रकाशझोत. (What is Economic Survey and why is it important?)

अर्थसंकल्प आणि आर्थिक सर्व्हेक्षणात फरक काय

सरकार नेहमी पुढच्या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करत असते. तर आर्थिक सर्व्हे आहे चालू आर्थिक वर्षाचा लेखाजोखा असतो. उदाहरणच सांगायचं झालं तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण येत्या 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प आगामी आर्थिक वर्ष 2021-2022साठीचा असेल. मात्र, उद्या जो आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल सादर केला जाणार आहे, तो 2020-2021साठीचा असेल. त्यात संपूर्ण आर्थिक वर्षाचा लेखाजोखा असले.

जीडीपी घटला

कोरोना संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था अत्यंत बिकट आहे. बहुतेक रेटिंग एजन्सींनी यंदाच्या जीडीपीमध्ये 10 टक्क्यांने घट होणार असल्याचं सांगितलं आहे. या वर्षी पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये 24 टक्क्याने घट झाली आहे. दोन तिमाहीचे आकडे सरकारने जाहीर केलेले आहेत. तिसऱ्या तिमाहीतही जीडीपीमध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वांच्या नजरा आर्थिक सर्व्हे अहवालावर लागल्या आहेत. कारण आर्थिक सर्व्हे जाहीर झाल्यानंतरच देशाची अर्थव्यवस्था किती डबघाईला आलीय आणि त्यात किती सुधारणा झाली, हे दिसून येणार आहे.

आर्थिक सर्व्हे काय असतो?

आर्थिस सर्व्हे देशाचा वर्षभराचा लेखाजोखा असतो. वर्षभरात देश आर्थिक मोर्चावर कोणत्या स्थितीत आहे हे या आर्थिक सर्व्हेक्षणातून स्पष्ट होतं. तसेच येणाऱ्या काळात देशाची आर्थिक परिस्थिती काय असू शकते याचा अंदाज सुद्धा आर्थिक सर्व्हेक्षणातून येतो. सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे अर्थ मंत्रालयाच्या या अहवालातून देशाच्या अर्थव्यवस्थेचा पूर्ण पिक्चर दिसून येतो. आर्थिक सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून सरकारला काही महत्त्वाचे सल्लेही दिले जातात. मात्र, केलेल्या शिफारशी लागू करणं हे सरकारवर बंधनकारक नसतं. (What is Economic Survey and why is it important?)

आर्थिक सर्व्हे कोण तयार करतं?

मुख्य आर्थिक सल्लागाराची टीम हा आर्थिक सर्व्हे तयार करते. सध्या कृष्णमूर्ती सुब्रमण्यम हे आर्थिक सल्लागार आहेत. त्यांच्याच टीमने उद्या सादर होणारा आर्थिक सर्व्हे अहवाल तयार केला आहे. अर्थ मंत्री हा अहवाल संसदेत मांडतात. (What is Economic Survey and why is it important?)

 

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: LIC च्या नियमांत बदल होणार? केंद्र सरकारच्या जोरदार हालचाली

तुमच्या खिशापासून ते शिक्षण आणि आरोग्यापर्यंत, 2020 च्या अर्थसंकल्पातील 10 मोठ्या घोषणा

हक्काच्या घराचा मार्ग सोपा होणार, 2021-22 च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान घरकुल योजनेसाठी भरभक्कम तरतूद?

(What is Economic Survey and why is it important?)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI