नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचं शेवटचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला आहे. यामध्ये निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करत असतांना आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशवासीयांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये अर्थसंकल्पातील मुख्य सात उद्दिष्टांना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ‘सप्तर्षी’ असे म्हंटले आहे. अर्थसंकल्पातील सप्तर्षी म्हणजेच सर्वसमावेशक वाढ, वंचितांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमता विस्तार, हरित वाढ, युवा शक्ती, वित्तीय क्षेत्र या सात बाबींचा समावेश आहे. अर्थसंकल्प सादर करत असतांना ही सप्तर्षी समोर ठेऊन अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याचे आपल्या भाषणात निर्मला सीतारमण यांनी सांगत मोठ्या घोषणा केल्या आहेत.