Rule Change : LPG ते विमानतळापर्यंत…! 1 सप्टेंबरपासून देशात होणार 5 मोठे बदल, काय काय महागणार?
1 सप्टेंबरपासून देशात 5 मोठे बदल पाहायला मिळतील. जाणून घ्या पाच दिवसांनी नेमकं काय काय महागणार आहे.

ऑगस्ट महिन्याचे शेवटचे 5 दिवस उरले आहेत. त्यानंतर येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात देशात 5 मोठे बदल पाहायला मिळतील. या बदलाचा घरातील किचनमधील वस्तंपासून परदेश यात्रेवरही परिणाम होणार आहे. एलपीजी सिलिंडरच्या किंमतीतही फरक पाहायला मिळणार आहे. कारच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे. नव्या नियमांमुळे सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसण्याची शक्यता आहे. जाणून घ्या नेमके काय बदल होणार आहेत.
एलपीजी गॅस सिलिंडरचे दर
महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक बदल दिसून येईल. ऑइल मार्केटिंग कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल करण्याची शक्यता आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात बदल झाल्यास त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर पाहायला मिळू शकतो. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेला 19 किलो व्यावसायिक गॅसची किंमतीत 202 रुपयांनी कपात केली होती. तर 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता.
एलपीजीसाठी केवायसीचा नियम
घरगुती एलपीजी सिंलिंडर पाहिजे असतील. तर आता एलपीजीशी संबंधित कामांची डेडलाइन पाळावी लागणार आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी केवळ 5 दिवसांचा अवधी म्हणजे 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख असणार आहे. IOCL, BPCL, HPCL ने एलपीजी सिलिंडरसाठी ई-केवायसीची प्रक्रिया करण्याची डेडलाइन ही 23 ऑगस्टवरून वाढवून 31 ऑगस्ट करण्यात आली. ग्राहकांनी डेडलाइन न पाळल्यास गॅस सिलिंडर मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
ATF, CNG-PNG च्या किंमतीत बदल दिसणार
ऑइल मार्केटिंग कंपन्या महिन्याच्या पहिल्या दिवशी LPG गॅसचा नवीन दर जारी करण्याची शक्यता आहे. तसेच ATF च्या दरातही बदल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे विमानातून प्रवास करणार्यांना तिकीटासाठी अधिकचे पैसे मोजावे लागू शकतात. महिन्याच्या पहिल्याच दिवशी नवीन दर जारी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे CNG, PNG च्या दरात बदल पाहायला मिळू शकतो.
कार महागणार
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला कारची आवड असणाऱ्यांना झटका बसण्याची शक्यता आहे. टाटा मोटर्स पॅसेंजर्स व्हीकल्स लिमिडेट 1 सप्टेंबर 2026 पासून सर्व कार आणि एसयूव्हीच्या किंमतीत 25000 रुपयांनी वाढ करण्याची शक्यता आहे. ही दरवाढ ICE आणि इलेक्ट्रॉनिक वाहनांना लागू होईल.
विमानतळ
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसांपासून परदेश प्रवासाबाबत महत्वपूर्ण बदल लागू होणार आहे. भारतातून इतर देशात प्रवास करणाऱ्यांना इमिग्रेशन काऊंटवर बोर्डिंग पासवर शिक्का मारण्याची गरज भासणार नाही. प्रवाशांच्या मोबाइल फोनवरील इलेक्ट्रॉनिक बोर्डिंग पास किंवा प्रत दाखवून इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करता येईल. या नियमामुळे विमान प्रवाशांना दिलासा मिळेल.
