AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Cylinder: मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, आता LPG सिलिंडरची चिंता मिटली, दर कमी होणार?

LPG Cylinder News: पश्चिम आशियातील संघर्षामुळे आखाती देशांकडून होणाऱ्या पुरवठ्यात व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने एलपीजी आणि एलएनजीची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.

LPG Cylinder: मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, आता LPG सिलिंडरची चिंता मिटली, दर कमी होणार?
| Updated on: Aug 26, 2026 | 7:36 AM
Share

LPG Cylider Purchase: पश्चिम आशियातील संघर्षामुळे आखाती देशांकडून होणाऱ्या पुरवठ्यात व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने एलपीजी आणि एलएनजीची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. ही माहिती सागरी माहिती कंपनी केप्लरच्या आकडेवारीवर आधारित आहे. केप्लरच्या मते, भारताने ऑगस्टमध्ये अमेरिकेकडून अंदाजे ६.२ लाख टन एलपीजी आयात केला, तर जुलैमध्ये हा आकडा ८.९ लाख टन होता. ऑगस्टमध्ये अमेरिकेकडून झालेला पुरवठा भारताच्या एकूण एलपीजी आयातीच्या ७३ टक्क्यांहून अधिक होता.

तुलनेत, आखाती देशांकडून होणाऱ्या एलपीजी आयातीत मोठी घट झाली आहे. ऑगस्टमध्ये भारताला संयुक्त अरब अमिरातीकडून (यूएई) अंदाजे १.४ लाख टन आणि कतारकडून अंदाजे ६०,००० टन एलपीजी मिळाला. सौदी अरेबियाने जुलै आणि ऑगस्टमध्ये भारताला कोणताही एलपीजी पुरवठा केला नाही. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध सुरू झाल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी प्रभावीपणे बंद झाल्यामुळे आखाती देशांकडून होणाऱ्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. हा जलमार्ग आखाती तेल आणि वायू उत्पादक देशांकडून भारतासारख्या प्रमुख ग्राहकांना कच्चे तेल आणि वायूचा पुरवठा करण्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग आहे.

अमेरिकेकडून भारताला होणारा एलएनजीचा पुरवठाही वाढला आहे. अमेरिकेकडून होणारी एलएनजीची आयात जुलैमधील ०.७२ दशलक्ष टनांवरून ऑगस्टमध्ये अंदाजे ०.७५ दशलक्ष टनांपर्यंत वाढली. दरम्यान, भारताचा सर्वात मोठा एलएनजी पुरवठादार असलेल्या कतारकडून होणारी आयात एप्रिलमध्ये शून्य राहिली. कतार पूर्वी भारताला दरमहा १.२ दशलक्ष टनांपर्यंत एलएनजीचा पुरवठा करत असे. केप्लरचे वरिष्ठ व्यवस्थापक सुमित रितोलिया म्हणाले, “गेल्या काही महिन्यांत, विशेषतः एलपीजीच्या बाबतीत, अमेरिकेकडे कल वाढला आहे. भारताने जाणूनबुजून पश्चिम आशियाई पुरवठ्याऐवजी अमेरिकन पुरवठ्याकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे, असे याकडे पाहू नये. हे मुख्यत्वे पश्चिम आशियाई पुरवठ्यात झालेली घट आणि भारतीय खरेदीदारांची त्यांच्या पुरवठ्याच्या स्रोतांमध्ये विविधता आणण्याची इच्छा यामुळे आहे.”

रशिया हा भारताचा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठादार आहे, भारताने ऑगस्ट महिन्यात रशियाकडून दररोज सुमारे २० लाख बॅरल कच्चे तेल खरेदी केले, जे दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुरवठदार असलेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या (६.१ लाख बॅरेल)  खरेदीपेक्षा तिप्पट जास्त आहे.

रिटोलियाच्या मते, जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचा पुरवठा मर्यादित असल्याने, सध्या रशियाकडून होणारी कच्च्या तेलाची आयात कमी होण्याची शक्यता नाही. पश्चिम आशियातील पुरवठ्यातील व्यत्ययांमुळे रशियन कच्च्या तेलाची पूर्णपणे जागा घेणे कठीण होईल. भारताने ऑगस्ट महिन्यात व्हेनेझुएलाकडूनही दररोज ३.८३ लाख बॅरल कच्च्या तेलाची आयात केली,. केप्लरच्या मते, अमेरिका आणि व्हेनेझुएलाच्या तुलनेत भारतासाठी कच्च्या तेलाचा स्त्रोत म्हणून अमेरिकन खंड अधिक महत्वाचा बनत आहे.

Follow Us