AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nepal Flood: नेपाळमध्ये निसर्ग कोपला, महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर, ही माहिती तयार ठेवा

Nepal Flash Flood: नेपाळमध्ये महापूराने होत्याचे नव्हते केले. भारतातून गेलेले भाविक आणि पर्यटक नेपाळमध्ये अडकलेले आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आले आहे. मंत्रालयात 24 तास हा कक्ष सुरू आहे. त्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

Nepal Flood: नेपाळमध्ये निसर्ग कोपला, महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर, ही माहिती तयार ठेवा
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर Image Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 27, 2026 | 8:53 AM
Share

नेपाळमधील रसुवा जिल्ह्यातील भोटेकाशी नदीत आलेल्या महापूराने परिस्थिती गंभीर झाली आहे. या नैसर्गित संकटात देशातील एकूण 133 नागरिक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही जणांचा समावेश आहे. बेपत्ता भारतीयांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अद्यापही त्यांच्याविषयीची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान महाराष्ट्र सरकारने नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आले आहे. मंत्रालयात 24 तास हा कक्ष सुरू आहे. त्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्यासाठी आणि मदत पोहचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक ऑनलाईन लिंक जाहीर केली आहे. मंत्रालयातील राज्य नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत असेल.

उत्तर नेपाळला सर्वाधिक फटका

नेपाळमध्ये बुधवारी, 26 ऑगस्ट रोजी दुपारी अचानक आलेल्या महापूराने अनेक शहरं उद्धवस्त झाली. गावचं गावं वाहून गेली. हॉटेल्स, शाळांना मोठा फटका बसला. पूल, रस्ते वाहून गेले. नेपाळमधील पर्यटन बोर्डाच्या आकडेवारीनुसार, या नैसर्गिक आपत्तीत एकूण 403 नेपाळी आणि अनेक परदेशी नागरिकांशी कोणताही संपर्क झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये सर्वाधिक 133 भारतीय पर्यटकांचा समावेश आहे. संपर्क न होऊ शकलेल्यांमध्ये 62 नेपाळी, 47 अमेरिकन, 34 ऑस्ट्रेलियन, 33 ब्रिटिश आणि 24 कॅनेडियन नागरिकांचा समावेश आहे. याशिवाय मलेशिया, यूक्रेन, सिंगापुर, दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड, जपान, जर्मनी, फ्रान्स, आयर्लंड, नेदरलँड, रशिया, स्पेन, बेलारूस, फिनलँड, हंगेरी, इस्त्रायल, लिथुआनिया, पोर्तुगाल आणि फिलिपाईन्समधील नागरिकांचा यामध्ये समावेश आहे. त्यातील अनेक जण हे नॉटरिचेबल आहेत.

या टोल फ्री क्रमांकावर साधा संपर्क

महाराष्ट्र राज्य नियंत्रण कक्षाकडून एक विशेष टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 1070 आणि नियंत्रण कक्ष 91-9321587143 क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील नागरिकांनी, त्यांचे मित्र, नातेवाईक जर नेपाळमध्ये अडकले असतील तर त्यांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या नातेवाईकांचे नाव, त्यांचा मोबाईल क्रमांक, नेपाळमध्ये ते सध्या कुठे अडकले आहेत. हॉटेल, ठिकाणाचे नाव, त्यांच्या यात्रेसंबंधीची माहिती आणि कुटुंबियांच्या संपर्काविषयीची माहिती उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नेपाळमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे. कुटुंबीयांचा संपर्क होत नसल्यास विशेष लिंकवर तातडीने माहिती नोंदवण्याचे धाराशिव चे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आवाहन केले आहे.  नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक द्यावा. टोल फ्री 1077 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे