AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushmita Sen : वयाच्या 50 व्या वर्षी सुष्मिता सेन लग्नाच्या योजनेबद्दल स्पष्ट बोललीच, का आहे अविवाहित?

Sushmita Sen : अभिनेता सुष्मिता सेन अनेक सिनेमांमध्ये उत्तम पत्नीच्या भूमिकेत दिसली. पण खऱ्या आयुष्यात अभिनेत्री वयाच्या 50 व्या वर्षी देखील एकटीच आहे. पण नुकताच झालेल्या एका सेशनमध्ये अभिनेत्रीने लग्नाच्या योजनेबद्दल स्पष्टच सांगितलं.

Sushmita Sen : वयाच्या 50 व्या वर्षी सुष्मिता सेन लग्नाच्या योजनेबद्दल स्पष्ट बोललीच, का आहे अविवाहित?
Sushmita Sen
| Updated on: Aug 27, 2026 | 8:46 AM
Share

Sushmita Sen : अभिनेत्री सुष्मिता सेन हिने तिच्या लग्नाच्या योजनेबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत अभिनेत्रीने नेटकऱ्यांच्या अनेक प्रश्नाची उत्तरं दिली. दरम्यान एका नेटकऱ्यांने सुष्मिताला हिला लग्नाच्या योजनेबद्दल विचारलं. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘या प्रश्नाचं उत्तर तु्म्ही आणि मी आपण दोघे शोधतच राहू…’, सांगायचं झालं तर, सुष्मिता हिच्या नावाची चर्चा अनेक सेलिब्रिटींसोबत रंगली. पण कोणत्याच सेलिब्रिटीसोबत अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.

ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा सुष्मिता सेन हिने तिचं लग्न न करण्याचं कारण सांगितलं आहे. याआधी देखील अभिनेत्रीने अनेकदा तिच्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. 2022 मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात तर, अभिनेत्री तिच्या आयुष्यात आलेल्या पुरुषांबद्दल आणि तिच्या मुलींबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं.

सुष्मिता म्हणालेली, ‘नशिबाने माझ्या आयुष्यात अनेक खास पुरुषांची एन्ट्री झाली. पण माझं लग्न न होण्याचं एकमात्र कारण म्हणजे, त्यांनी मला निराश केलं. याचा माझ्या मुलांशी काहीही संबंध नाही. माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा त्यांनी मोठ्या मनाने स्वीकार केला, कधीच कोणत्याही प्रकारचे आक्षेप त्यांनी घेतला नाहीय माझ्या मुली कधीच माझ्या आयुष्याचा भाग राहिल्या नाहीत.’

पुढे अभिनेत्री म्हणालेली, ‘एक दोन नाही तीन वेळा माझं लग्न होणार होतं. पण प्रत्येक वेळी गोष्टी बिनसल्या. तीन वेळा मला देवाने वाचवलं… मी तुम्हाला सांगू देखील शकत नाही की, त्यांच्या आयुष्यात किती अडचणी आल्या. देवाने माझी रक्षा केली. कारण ते माझ्या दोन मुलींची रक्षा करत होते. त्यामुळे कोणत्याच वादग्रस्त अडचणीत त्यांनी मला अडकवलं नाही.’

सांगायचं झालं तर, सुष्मिता यापूर्वी मॉडेल रोहमन शॉलसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ते अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते आणि रिपोर्टनुसार, 2021 मध्ये ते वेगळे झाले. अभिनेत्री काही काळासाठी व्यावसायिक ललित मोदी याच्यासोबतही रिलेशनशिपमध्ये होती. दोघांचे अनेक खासगी फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले.

Follow Us
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....