10000000000 रुपयांची प्रॉपर्टी, महागडे घर मुंबईत कोणी केलं खरेदी; कोणी लावली मेगा बोली
Expensive Home : मुंबई हे स्वप्नांचे शहर म्हटले जाते. अनेक जण या शहरात काही ना काही स्वप्न उराशी घेऊन येतात. या शहरात घर घेणे सोप्प काम नक्कीच नाही. येथे नुकताच एका महागड्या घराचा सौदा झाला. त्याची सध्या चर्चा सुरू आहे.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. उराशी स्वप्न घेऊन अनेक जण या शहरात येतात. हे शहर त्यांना नाराज करत नाही असे म्हणतात. या शहरात बॉलिवूड आहे. राजकारण आहे, शेअर बाजार आहे आणि बरंच काही आहे. जीवनाची कसरत आहे तर जगातील तमाम सुख-सोयी पण काहींच्या नशीबात आहेत. हे सर्व महागडी बाजारपेठ म्हणून पण ओळखले जाते. येथील घरांनी तरी महागाईच्या आकड्यांना भुरळ घातली आहे. अँटिलियाच नाही तर अनेक जगातील अनेक महागड्या मालमत्ता या शहराला चार चांद लावत आहेत.
1 हजार कोटींच्या घराची खरेदी
तर या शहरात अजून एका महागड्या घराची चर्चा सुरू झाली आहे. हे घर गोरेगाव परिसरात आहे. ओबेरॉय रिअल्टीच्या एलिसियन या प्रोजेक्टमध्ये हे अपार्टमेंट आहे. त्याचा 3030.07 चौरस फूट कार्पेट एरिया आहे. त्यात तीन वाहनतळं आहेत. रेरानुसार, या अपार्टमेंटचा कार्पेट एरिया 281.50 चौरस मीटर इतका आहे. यामध्ये तीन कार पार्किंगची व्यवस्था आहे.
या व्यवहारात खरेदीदाराने शासन दरबारी 91.86 लाखांची मुद्रांक शुल्क आणि 3 लाखांचे नोंदणी शुल्क भरले आहे. ओबेरॉय रिअल्टीच्या एलिसियन प्रोजेक्टमध्ये 116 मालमत्तांची विक्री झाली आहे. एकत्रित व्यवहार पाहिल्यास त्याचे मूल्य 1035 कोटी इतके होते. या प्रकल्पातील मालमत्तांची सरासरी किंमत 50,869 रुपये प्रति चौरस फूट इतके आहे. स्क्वेअर यार्ड्स डेटा इंटेलिजेंसने याविषयीची आकडेवारी दिली आहे.
कोणी खरेदी केले महागडे घर?
साराभाई व्हर्सेस साराभाई, खिचडी, पुष्पा इम्पॉसिबल आणि इतर मालिकांचे दिग्दर्शक, अभिनेता, पटकथा लेखक आतिश कपाडिया यांनी ही महागडी घर खरेदी केली आहे. पत्नी अॅलिसन कपाडिया हिच्यासह त्यांनी गोरेगाव परिसरात 15.31 कोटींचे अपार्टमेंट खरेदी केले आहे. नुकतेच जून 2025 मध्ये याविषयीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. गेल्या काही वर्षात मुंबई, दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, बेंगळुरू, पुणे या शहरातील घरांच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत. लक्झरियस अपार्टमेंटमध्ये एखाद्या 7 स्टारसारख्या सोयी-सुविधा देण्यात येतात. पण त्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते. या शहरातील उद्योजक आणि बड्या सेलेब्रिटी या मालमत्ता खरेदी करतात. त्यातून विकासकाला मोठा फायदा होतो. तर शासनाला मोठा खजिना मिळतो.
