AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrakant Khaire : सगळ्या जगाला माहीत आहे, आतून फडणवीसांना वाटतं… चंद्रकांत खैरे हे काय म्हणाले?

Chandrakant Khaire : त्यावेळी 'चिमण्यांनो परत या' हे जे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते ते आज पूर्ण होत आहे, असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले. दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत. त्याचवेळी त्यांनी फडणवीसांच्या मनात काय सुरू आहे, याविषयी एक दावा केला आहे.

Chandrakant Khaire : सगळ्या जगाला माहीत आहे, आतून फडणवीसांना वाटतं... चंद्रकांत खैरे हे काय म्हणाले?
चंद्रकांत खैरे, देवेंद्र फडणवीसImage Credit source: गुगल
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: | Updated on: Jul 04, 2025 | 2:23 PM
Share

उद्या राज्याच्या राजकारणात एक विशेष घटना घडत आहे. मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेना एकाच मंचावर असतील. दोन्ही ठाकरे बंधु विजय मेळावा घेत आहेत. राज्यातील जुन्या शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी या घडामोडीवर मत मांडले आहे. जेव्हापासून या हालचाली सुरू झाल्या तेव्हा पासून, उत्सहाचे वातावरण झाले आहे. जेव्हा दोन्ही नेत्यांची बैठक झाली. मेळाव्याचा हा निर्णय झाला, नंतर आम्ही सगळीकडे बोलायला सुरुवात केली, असे ते म्हणाले.

दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावे

राज ठाकरे बाहेर पडले तेव्हा आम्हाला दुःख झाले, पण आता आनंद होत आहे की, ते दोघे एकत्र येत आहे. राज ठाकरे सोडून गेले तरी बाळासाहेब ठाकरे यांचे त्यांच्यावर प्रेम होते. दोन्ही भाऊ एकत्र आले तर, महाराष्ट्र मध्ये जो घाणेरडा प्रकार सुरू आहे, भ्रष्टाचार,गद्दाऱ्या तोडफोड सुरू आहे, त्याविरोधात आवाज उठेल. हा जो प्रकार सुरू आहे, तो लोकांना आवडला नाही. तुम्ही लाडक्या बहि‍णीला पैसे देत नाही पण आमदारांना भरपूर पैसे देता, ते लोकांना पटले नाही. आज मराठी माणसाला वाटते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे. त्यावेळी या चिमण्यांनो परत या हे जे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते ते आज पूर्ण होत असल्याचा दावा खैरेंनी केला.

नाऱ्या बिऱ्याला ज्या टीका करायच्या ते करु द्या

तुम्हाला वाटत असेल आज बाळासाहेब ठाकरे इथे नाहीत, पण साहेब आज इथे आहेत आणि ते लक्ष देतात. आजही उद्धव ठाकरे कोणता निर्णय घ्यायचा असेल तर बाळासाहेब ठाकरे यांच्या रूममध्ये जाऊन दर्शन घेतात आणि त्यांच्याशी बोलतात, आणि जो काही निर्णय घ्यायचा, तो आजही बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने घेतात, आणि मीही तसेच करतो, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला.

उद्या मुंबई मध्ये जबरदस्त वातावरण राहणार आहे, उद्या मनसे, शिवसेना आणि इतर मराठी जनता येणार आहे. मी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना धन्यवाद देतो त्यांनी चांगली भूमिका घेतली. मग नाऱ्या बिऱ्या ज्या टीका करतात ते करु द्या, शेवटी काही जरी झाले तरी दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

फडणवीसांना काय वाटते?

देवा भाऊ म्हणतात चहा प्या, समोसा घ्या, तुम्ही पनीर खा, तुम्ही व्यायाम करा, तुम्ही सेव्हिंग करा, हे देवेंद्र फडणवीस वरतून बोलतात, पण आतून त्यांना वाटते हे दोघे भाऊ एकत्र येऊ नये, आणि हे सर्व दुनियेला माहीत आहे. फडवणीस वरतून बोलतात, असा टोला खैरेंनी लगावला. पण काही टिन पाट लोक बोलतात असे होऊ शकत नाही, त्यांना वाटते हे दोघे एकत्र आले तर आपले काय होईल, आणि या भीतीने ते लोक बोलतात.उद्या आमचे नेते उद्धव ठाकरे आणि मी त्याठिकाणी त्यांच्या सोबत असणार आहोत आणि राज ठाकरे यांना पण अभिवादन करणार आहोत, दोघांना अभिवादन करू, असे खैरे म्हणाले. सुप्रीम कोर्टाची जी तारीख ठरलेली आहे, तो निर्णय द्यावा, धनंजय चंद्रचूड यांनी तर काहीच केले नाही, परंतु आता न्यायदेवतेने काही केले पाहिजे ही आमची मनोमन इच्छा आहे आणि अशी आपण जगदंबेला प्रार्थना करतो, असे मत खैरेंनी व्यक्त केले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?