Adani Ports Q4: अदानी पोर्ट्सच्या नफ्यात 21 टक्क्यांची घसरण; तरीही अदानींची बोटं तुपात

कंपनीने सांगितले की, बोर्डाने प्रति शेअर 5 रुपये लाभांशाची शिफारस केली आहे, जे अंदाजे रु. 1056 कोटी होते आणि नोंदवलेल्या PAT च्या 22 टक्के आहे.

Adani Ports Q4: अदानी पोर्ट्सच्या नफ्यात 21 टक्क्यांची घसरण; तरीही अदानींची बोटं तुपात
अदानी पोर्ट्सImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 11:57 AM

नवी दिल्ली : अदानी पोर्ट्सने (Adani Ports) 31 मार्चच्या समाप्तीनंतर आपल्या चौथ्या तिमाही आणि या वर्षीचे रिपोर्ट मंगळवारी जाहीर केले. ज्यात शुद्ध लाभ (Net Profit)एक वर्षांच्या आधी 1,321 कोटी रुपये होते. त्यात मार्च 2022 मध्ये घसरण झाली असून ते 1,033 कोटी रुपयांवर आली आहे. त्यामुळे अदानी पोर्ट्समध्ये या तब्बल 21 टक्क्यांची घसरण झाल्याचे समोर आले आहे. मात्र एकीकडे घसरण होत असले तरीही अदाणी पोर्ट्सला नफा (Profit) झाल्याचे चित्र समोर येत आहे. अदानी पोर्ट्सचा या वर्षातील एकूण उत्पन्न 4,072 होते जे वाढले असून 4,418 कोटी रुपये झाले आहे. तर यावर कंपनीने सांगितले की, तिने एकूण 312 एमएमटी कार्गो व्हॉल्यूम गाठला आहे. जो वर्षभरात 26 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचा एकत्रित EBITDA 22 टक्क्यांनी वाढून तो 9,811 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ज्यामुळे महसूलात 27 टक्के वाढ झाली. क्रेडिट गुणवत्ता राखताना 11,400 कोटी रुपयांचे अधिग्रहण करण्यात आल्याचेही कंपनीचे म्हणणे आहे. त्यावर आता कंपनीचे सीईओ करण अदानी म्हणाले, “आर्थिक वर्ष 22 हे APSEZ साठी एक उत्कृष्ट वर्ष आहे, ज्याने स्वतःसाठी विविध टप्पे गाठले आणि भारताच्या सागरी उद्योगासाठी नवीन बेंचमार्क निर्माण केले आहेत.”

21 टक्क्यांनी वाढ

अदानी बंदरांचा एकत्रित महसूल 27 टक्क्यांनी वाढून तो रु. 15,934 कोटी झाला आहे. जो बंदरे, लॉजिस्टिक आणि SEZ मध्ये वाढ झाली आहे. बंदरांच्या महसूलात एकूण 21 टक्क्यांनी वाढ झाली असून तो 12,964 कोटी रुपये झाला आहे. लॉजिस्टिक व्यवसायातून मिळणारा महसूल 1,208 कोटी रुपये होता जो 26 टक्क्यांनी वाढला आहे.

दरम्यान एकत्रित महसूल EBITDA 22 टक्क्यांनी वाढून तो 9,811 कोटी रुपये झाला आहे. तर पोर्ट EBITDA 21 टक्क्यांनी वाढून तो 9,120 कोटी रुपये झाला आहे. लॉजिस्टिक व्यवसाय EBITDA 41 टक्‍क्‍यांनी वाढून 320 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ज्यात कार्गोचे वैविध्य, तोट्याचे मार्ग काढून टाकणे आणि कार्यक्षमतेकडे लक्ष दिले जात आहे.

हे सुद्धा वाचा

5 रुपये लाभांशाची शिफारस केली आहे

FY22 मध्ये EBITDA चे निव्वळ कर्ज 3.4X वर होते, जे 3-3 झाले आहे. 5Xच्या मार्गदर्शित श्रेणीमध्ये आहे. एकत्रित महसूल पोर्ट EBITDA जोडल्यानंतर, गुणोत्तर 3.0X होईल. यावर कंपनीने सांगितले की, बोर्डाने प्रति शेअर 5 रुपये लाभांशाची शिफारस केली आहे, जे अंदाजे रु. 1056 कोटी होते आणि नोंदवलेल्या PATच्या 22 टक्के आहे.

अदानी पोर्ट्सने काही मोठे प्रकल्प मिळवले आहेत. “FY22 मधील संपादनामध्ये APSEZ साठी अंदाजे 11,400 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तर अंदाजे 3,750 कोटी रुपयांच्या ऑर्गेनिक कॅपेक्ससह यशस्वीरित्या गुंतविण्यात आल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.