AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar: विमान अपघातामागे कुणाचा हात? रोहित पवारांचा तो सनसनाटी आरोप, ती व्यक्ती कोण?

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash: आमदार रोहित पवार आज बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी गुन्हा नोंदवण्यासाठी दाखल झाले. पण अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी दबावामुळे FIR दाखल होत नसल्याचा आरोप केला.

Rohit Pawar: विमान अपघातामागे कुणाचा हात? रोहित पवारांचा तो सनसनाटी आरोप, ती व्यक्ती कोण?
रोहित पवार, अजित पवार, युगेंद्र पवारImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 26, 2026 | 1:36 PM
Share

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणात DGCA आणि VSR कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार रोहित पवार आक्रमक दिसले. बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात त्यांनी अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी विमान अपघातामागे कुणाचा हात आहे ,यावरून मोठे भाष्य केले. त्यांनी राज्यातील एका मोठ्या नेत्याचा उल्लेख पण केला. व्हीएसआर कंपनीच्या मालकाच्या जवळ अनेक लोक असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या बोलण्याचा नेमका रोख कुणाकडे आहे याची चर्चा आता होत आहे.

FIR दाखल झाला पाहिजे

आज बारामतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी गुन्हा दाखल करण्याविषयी पुन्हा आग्रही भूमिका मांडली. ते म्हणाले की विमान अपघात हा गुन्हा १०० टक्के दखल पात्र आहे. मग यात गुन्हा का दाखल केला जात नाही. अजितदादांची दखल घेतली जात नाही असं व्यक्तीमत्त्व होतं का. सीआयडी आणि सीबीआयकडून चौकशी करा. आमचं काही म्हणणं नाही. पण एफआयआर दाखल करण्यात आला पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली केली आहे.

कॉज ऑफ अॅक्शन आला आहे. त्या आधारे एफआयआर दाखल झाला पाहिजे. दादांना न्याय का मिळत नाही. एफआयआर का दाखल करत नाही. आम्ही चुकीचा एफआयआर दाखल करत असू तर आमच्यावर कारवाई करा. आम्हाला तुरुंगात टाका. पण ऐकत नाही. कुणाला तरी वाचवलं जात आहे. कुणाचा तरी प्रेशर आहे. पोलीस अशा पद्धतीने वागत असल्याने हा घातपात आहे का हा संशय निर्माण होत आहे, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

अपघातामागे कुणाचा हात?

व्हीएसआर कंपनीचे मालक अनेक मोठ्या लोकांच्या जवळचे आहेत. रोहित सिंगच्या लग्नाला महाराष्ट्रातील मोठा नेता गेला होता. आंध्राचा नेता गेला. त्याच्या एनबीएससी कंपनीला रोहित सिंगने मोठा निधी दिला. त्यामुळे त्याला वाचवलं जात आहे असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अजितदादांना खराब विमान दिलं हे डीजीसीए सांगतं. त्यामुळे हे विमान मुद्दाम दिलं का. यामागे मोठ्या व्यक्तीचा हात आहे असा सवाल रोहित पवार यांनी केला. चौकशी अपघतावर होतेय. चौकशी कराच. पण घातपात आहे का, क्रिमिनिल अँगल आहे का याचीही चौकशी करा. ते केलं जात नाही. याचा अर्थ कोणत्या ना कोणत्या मोठ्या व्यक्तीचा या मागे हात आहे. हा संशय आहे, असा मोठा दावा रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत केला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...