Business : अॅक्टिंगमध्ये दमखम, प्रेग्नेसीमध्ये स्टार्टअप, आता विदेशातही फडकवणार ही अभिनेत्री बिझनेसचा झेंडा

Business : बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींनी सुरु केलेले स्टार्टअपने आता गगन भरारी घेतली आहे.

Business : अॅक्टिंगमध्ये दमखम, प्रेग्नेसीमध्ये स्टार्टअप, आता विदेशातही फडकवणार ही अभिनेत्री बिझनेसचा झेंडा
हा स्टार्टअप साता समुद्रापारImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 14, 2022 | 6:51 PM

मुंबई : बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींनी (Bollywood Actress) अॅक्टिंगसोबत बिझनेसमध्येही (Business) नशीब आजमावले आहे. त्यात नव्या दमाच्या अभिनेत्रींचा पुढाकार आहे. अनन्या पांडे (Ananya Pande), जान्हवी कपूर (Janvhi Kapoor) असो वा आलिया भट्ट (Alia Bhat) या अभिनेत्रींनी इतर स्टार्टअपमध्ये पार्टनरशीप केली आहे. अथवा स्वतःचा नवीन ब्रँड सुरु केला आहे.

आता बॉलिवूड अॅक्टर आलिया भट्टचं उदाहरण घ्याना, ग्राहकांपर्यंत थेट माल पोहचवण्याचा विडा तिने उचलला आहे. Ed-a-Mamma या नावाने तिने स्टार्टअप सुरु केला आहे. कोरोना काळात 2020 मध्ये तिने हा उद्योग सुरु केला आहे. आता या उद्योगाला पंख फुटले असून लवकरच हा उद्योग साता समुद्रपार पोहचणार आहे.

लहान मुलांची किफायतशीर आणि स्वस्त कपडे घरपोच मिळावी यासाठी तिने हा ब्रँड सुरु केला आहे. अर्थात या बिझनेसमध्ये तिने चांगला जम बसवला आहे. अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तिचा ब्रँड धुमाकूळ घालत आहे.

हे सुद्धा वाचा

लहान मुलांना तिच्या ब्रँडची कपडे आवडल्याने या ब्रॅंडचे नाव अल्पावधीतच सर्वदूर पोहचले. First Cry, AJIO, Myntra यासह अन्य ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आलियाचा ब्रँड खरेदी करता येतो.

आता आलिया भटने तिचा हा स्टार्टअप मोठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदा हा ब्रँड UAE या देशात पाऊल ठेवणार आहे. तर दुसऱ्या वर्षी युरोप आणि त्यानंतर इतर देशात हा ब्रँड पोहचणार आहे. त्यासाठीची तयारी करण्यात आली आहे.

ऑनलाईनसोबतच आलियाच्या Ed-a-Mamma या ब्रँडचे कपडे आऊटलेटमध्येही मिळतील. त्यासाठी अनेक ऑऊटलेटसोबत करार करण्यात आले आहेत. आलियासोबत सध्या 60 जणांची टीम काम करत आहे.

टीमच्या मेहनतीने आणि विविध डिझाईनच्या बळावर या ब्रँडने अल्पावधीतच झेप घेतली आहे. या कंपनीचा विक्रीचा आकडा दहा पट वाढला आहे. त्यामुळे उत्साह दुणावलेल्या या ब्रँडने आता विदेशात नशीब आजमवण्याचे ठरवले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.