
अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू झाला आहे. सध्या, Amazon Prime सदस्यांसाठी हा सेल लाइव्ह आहे. वर्षातील सर्वात मोठा शॉपिंग इव्हेंट असलेला हा अमेझॉनचा हा सेल सुरू झाला आहे. तर यामध्ये तुम्हाला अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तुंवर मोठ्या प्रमाणात सवलत दिली जात आहे. नवीन GST 2.0 दर लागू झाल्यानंतर एसी आणि रेफ्रिजरेटर स्वस्त झाले आहेत. जर तुम्ही तुमच्या घरासाठी नवीन एअर कंडिशनर किंवा रेफ्रिजरेटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सेल दरम्यान एसी आणि रेफ्रिजरेटरवरील बंपर डिस्काउंटचा फायदा घेऊन तुम्ही हजारो रुपये वाचवू शकता. चला तर मग आजच्या या लेखात आपण सेलबद्दल जाणून घेऊयात.
कॅरियर कंपनीचा हा 1.5 टनाचा एसी 52अंश उष्णतेमध्येही थंड हवा देऊ शकतो. यात 6-इन-1 मोड आणि एआय फीचर्स देखील आहेत. हा 5-स्टार रेटेड एसी Amazon वर अर्ध्या किमतीत विकला जात आहे. 50% डिस्काउंटनंतर तो 37,990 रूपयांना खरेदी करता येणार आहे.
हायर कंपनीचा हा एसी 60 अंश उष्णतेमध्येही संपूर्ण खोली थंड होण्यास सक्षम आहे. हा 1.5 टनचा एसी मॉडेल Amazon सेल दरम्यान 50% सवलतीत उपलब्ध आहे. सवलतीनंतर, हे मॉडेल 37,290 मध्ये खरेदी करता येईल. 50% सवलतीव्यतिरिक्त, या मॉडेलवर 1,000 ची Amazon कूपन सवलत देखील आहे, म्हणजेच तुम्ही कूपनसह अतिरिक्त बचत करू शकाल.
सॅमसंग कंपनीचा 236 लिटरचे सॅमसंग रेफ्रिजरेटर Amazon सेलमध्ये 39% सवलतीत 24,990 मध्ये खरेदी करता येईल. 39% सवलतीव्यतिरिक्त, या मॉडेलमध्ये अतिरिक्त 1,500 कूपन देखील आहे. पेमेंट करण्यापूर्वी कूपन लागू करून, तुम्ही हे रेफ्रिजरेटर 23,490 मध्ये खरेदी करू शकाल.
व्हर्लपूल कंपनीचा 308 लिटरचे रेफ्रिजरेटर Amazon सेलमध्ये 32% सवलतीत 32,490 मध्ये खरेदी करता येणार आहे. सध्या या मॉडेलवर कोणताही कूपन डिस्काउंट उपलब्ध नाही, परंतु अतिरिक्त सवलतीसाठी तुम्ही बँक कार्ड वापरून अतिरिक्त बचत करू शकता.
वर नमूद केलेल्या मॉडेल्स व्यतिरिक्त तुम्हाला बंपर डिस्काउंटसह आणखी बरेच इलेक्ट्रॉनिक मॉडेल्स मिळतील.