अॅमेझॉनचं विक्रेत्यांना गिफ्ट, आणखी 3 भाषांमध्ये व्यवसाय मॅनेज करता येणार

अॅमेझॉनने एका निवेदनात म्हटले आहे की, आगामी सणासुदीचा काळ डोळ्यांसमोर ठेवून हे पाऊल उचलण्यात आलेय, ज्यामुळे विद्यमान विक्रेते, अनेक संभाव्य आणि नवीन विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी विविध स्तरांतील बाजारपेठेतून फायदा होणार आहे.

अॅमेझॉनचं विक्रेत्यांना गिफ्ट, आणखी 3 भाषांमध्ये व्यवसाय मॅनेज करता येणार
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 7:33 AM

नवी दिल्ली : सणासुदीच्या आधीच मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अॅमेझॉनने आपल्या विक्रेत्यांना भेट दिलीय. विक्रेते आता Amazon.in मार्केटप्लेसवर मल्याळम, तेलुगू आणि बंगाली या तीन भाषांमध्ये त्यांचा ऑनलाईन व्यवसाय नोंदणी आणि व्यवस्थापित करू शकतील, अशी माहिती कंपनीने रविवारी दिली.

अॅमेझॉनने एका निवेदनात म्हटले आहे की, आगामी सणासुदीचा काळ डोळ्यांसमोर ठेवून हे पाऊल उचलण्यात आलेय, ज्यामुळे विद्यमान विक्रेते, अनेक संभाव्य आणि नवीन विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी विविध स्तरांतील बाजारपेठेतून फायदा होणार आहे. तसेच ते त्यांच्या आवडीच्या भाषेत काम करू शकतील.

8 भाषांमध्ये ऑनलाईन व्यवसाय व्यवस्थापित करण्याचा पर्याय

या ऑफरसह Amazon.in आता विक्रेत्यांना बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, मल्याळम, तेलुगू, तमीळ आणि इंग्रजीसह आठ भाषांमध्ये त्यांचा ऑनलाईन व्यवसाय व्यवस्थापित करण्याचा पर्याय देते.

अॅमेझॉनवर 8.5 लाख विक्रेते

कंपनीने म्हटले आहे की, कोणत्याही प्रादेशिक भाषेचा वापर करून विक्रेते अॅमेझॉन विक्रेता म्हणून नोंदणी करण्यापासून ते प्रथमच ऑर्डर व्यवस्थापित करण्यापर्यंत सर्व काही करू शकतात. Amazon.in वर सध्या सुमारे 8.5 लाख विक्रेते आहेत.

Amazon Great Indian Festival : ‘या’ प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काऊंट

Amazon च्या वार्षिक ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची घोषणा करण्यात आली आहे. विक्रीच्या तारखा अद्याप उघड झालेल्या नाहीत. अधिकृत टीझर सुचवतो की, ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यान अॅमेझॉन स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, स्मार्टवॉच, ट्रू वायरलेस इअरबड्स आणि इतर सर्व इलेक्ट्रॉनिक्सवर मोठ्या प्रमाणात सूट देणार आहे. मात्र डील्स अद्याप उघड झालेल्या नाहीत.

अॅमेझॉन ग्रेट इंडियन सेल 2021 च्या तारखांची अद्याप पुष्टी होणे बाकी आहे, परंतु या तारखा ऑक्टोबरच्या सुरुवातीच्या आहेत, अशी माहिती मिळाली आहे. अॅमेझॉनने आगामी ग्रेट इंडियन सेल 2021 मध्ये सहभागी होणाऱ्या बँकांची पुष्टी केली आहे. एचडीएफसी बँकेने डेबिट आणि क्रेडिट कार्डसह अतिरिक्त 10 टक्के सूट देण्यासाठी Amazon सोबत भागीदारी केली आहे. जास्तीत जास्त बचत करण्यासाठी, Amazon पे ICICI बँक क्रेडिट कार्ड ऑफर आहे जी तुमच्या अमेझॉन पे बॅलेन्समध्ये 5% कॅशबॅक आणि 750 रुपये जॉइनिंग बोनस देईल.

संबंधित बातम्या

65 डब्ल्यू फास्ट चार्जिंगसह मिळणार वनप्लस 9 आरटी, 3 सी सूचीमध्ये फोनचे तपशील उघड

आता व्हॉट्सअॅपवर फोटोला स्टिकर्समध्ये कनवर्ट होणार, लवकरच येणार नवीन फीचर

Amazon’s gift to sellers, will manage the business in 3 more languages

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.