AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन आणि रामदेव यांची मोठी खेळी; ऑनलाईन फूड कंपनीत खरेदी केली हिस्सेदारी, लवकरच येतोय IPO, पैशांची जमवाजमव केली का?

Amitabh Bachchan Investment : भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन आणि मोतीलाल ओसवाल यांनी मोठी खेळी खेळली आहे. या दोघांनी ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्ममध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या कंपनीचा लवकरच आयपीओ बाजारात दाखल होत आहे. त्याकडे गुंतणूकदारांचे लक्ष लागले आहे.

अमिताभ बच्चन आणि रामदेव यांची मोठी खेळी; ऑनलाईन फूड कंपनीत खरेदी केली हिस्सेदारी, लवकरच येतोय IPO, पैशांची जमवाजमव केली का?
अमिताभ बच्चन यांची मोठी गुंतवणूक
| Updated on: Aug 30, 2024 | 10:49 AM
Share

बॉलिवू़ड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेजचे चेअरमन रामदेव अग्रवाल यांनी ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीत मोठी गुंतवणूक केली आहे. कंपनीचा IPO लवकरच येऊ घातला आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी जवळपास 10,400 कोटी रुपये जमा करण्याच्या तयारीत आहे. IPO बाजारात दाखल झाल्यानंतर कंपनीचे मूल्यांकन 1.25 लाख कोटी रुपये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अशी झाली डील

अमिताभ बच्चन यांच्या कार्यालयाने स्विगीचे कर्मचारी आणि सुरुवातीच्या गुंतवणूकदारांकडून हे शेअर खरेदी केले आहेत. तर रामदेव अग्रवाल यांनी एक महिन्या अगोदरच क्विक कॉमर्स फर्म Zepto मध्ये 66.5 कोटी डॉलर गुंतवले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही दिग्गजांनी स्विगी कंपनीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.

स्विगीचा आयपीओ लवकरच

स्विगी भारतातील सर्वात मोठी फूड टेक कंपनी आहे. ही कंपनी लवकरच IPO घेऊन येत आहे. यामाध्यमातून कंपनी 15 अब्ज डॉलर म्हणजे 1.25 लाख कोटी रुपयांचे मूल्यांकन मिळवू इच्छित आहे. जागतिक वृत्तसंस्था रॉयटर्सच्या एका वृत्तानुसार, स्विगी IPO च्या माध्यमातून 1-2 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 10,400 कोटी रुपये जमा करण्याच्या तयारीत आहे. जर हे शक्य झाले तर हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे.

स्विगीला प्रसिद्ध जपानी गुंतवणूकदार मासयोशी सनच्या सॉफ्टबॅकेची पण मदत मिळाली आहे. कंपनीची भारतीय बाजारात मोठी पकड आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरीची वाढत्या मागणीचा फायदा घेण्यासाठी कंपनी आगेकूच करत आहे. कंपनीच्या असूचिबद्ध शेअरची मागणी वाढली आहे.

झोमॅटोला जबरदस्त फाईट

स्विगी गेल्या काही वर्षांपासून भारतीय फूड डिलिव्हरी बाजारात झोमॅटोला जबरदस्त टशन देत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कंपनीने गेल्या काही वर्षात व्यवसायात मोठी वाढ केली आहे. कंपनी आता इन्स्टामार्टच्या माध्यमातून ग्रोसरी डिलिव्हरी, किराणा सामान घरपोच पोहचवणे आणि स्विगी जिनीच्या माध्यमातून पिक अँड ड्रॉपच्या सेवा क्षेत्रात पण उतरली आहे. कंपनीचा IPO लवकरच येऊ घातला आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी जवळपास 10,400 कोटी रुपये जमा करण्याच्या तयारीत आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.