Anant-Radhika Wedding: अनंत अंबानीचे लग्न, या कर्मचाऱ्यांना “वर्क फ्रॉम होम”
Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी यांच्या लग्नाचे निमंत्रण भारतातील दिग्गज नेत्यांना दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवले आहे. ते या लग्नास उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या लग्नाचे निमंत्रण गांधी कुटुंबियांनाही स्वत: मुकेश अंबानी यांनी दिले आहे. परंतु गांधी परिवारातील कोणताही सदस्य लग्नास येणार नाही.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या लहान मुलगा अनंत यांचा विवाह सोहळा 12 जुलै रोजी होत आहे. फार्मा उद्योगपती वीरेन मर्चेंट आणि शैला मर्चेंट यांची मुलगी राधिका मर्चेंट यांच्याशी अनंत यांचा विवाह होत आहे. या विवाह सोहळ्यासाठी देशातील नाही तर जगभरातील दिग्गज येणार आहे.
हा विवाह सोहळा मुंबईतील प्रसिद्ध वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (बीकेसी) होणार आहे. यामुळे बीकेसीमधील कर्मचाऱ्यांना 15 जुलैपर्यंत “वर्क फ्रॉम होम” दिले आहे. कारण या विवाह सोहळ्यामुळे बीकेसी परिसरातील वाहतुकीवर 12 ते 15 जुलैपर्यंत निर्बंध आणले आहेत. या परिसरात राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई), आंतरराष्ट्रीय बँका आणि जगभरातील मोठ्या कंपन्यांचे कार्यालय आहेत.
3 जुलै रोजी झाला होता ‘मामेरू’ सेरेमनीने
अनंत अंबानी याच्या विवाह सोहळ्यास प्रारंभ 3 जुलै रोजी ‘मामेरू’ सेरेमनीने सुरु झाला होता. त्यात आंतरराष्ट्रीय पॉप गायक जस्टिन बीबरने परफॉर्म केले होते. त्यानंतर 8 जुलै रोजी मेंहदी सेरेमनी होणार झाली. अनंत आणि राधिकाच्या लग्नात मुष्टीयोद्धा माइक टायसन, ब्रिटेनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉनसन, टोनी ब्लेयर, कलाकार जेफ कून्स, स्व-सहायता प्रशिक्षक जे शेट्टी, अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री जॉन केरी कॅनेडाचे माजी पंतप्रधान स्टीफन हार्पर सहभागी झाले होते.
या दिग्गज लोकांना दिले आमंत्रण
अनंत अंबानी यांच्या लग्नाचे निमंत्रण भारतातील दिग्गज नेत्यांना दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवले आहे. ते या लग्नास उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या लग्नाचे निमंत्रण गांधी कुटुंबियांनाही स्वत: मुकेश अंबानी यांनी दिले आहे. परंतु गांधी परिवारातील कोणताही सदस्य लग्नास येणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील बड्या नेत्यांनाही लग्नाचे निमंत्रण दिले आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव या लग्नास उपस्थित राहणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या लग्न सोहळ्यासाठी आल्या आहेत.
