अनिल अंबानींसाठी या शेअरने उघडला कुबेरचा खजीना, 180 दिवसांत 50 टक्के वाढ
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसांत वाढ होत आहे. रिलायन्स पॉवर या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या सहा महिन्यांत मोठी वाढ झाली आहे.

भारताने इतिहास घडवला आहे. जपानला मागे टाकत भारताच्या अर्थव्यवस्थेने जगातील चौथ्या क्रमांक मिळवला आहे. त्याचे पडसाद सोमवारी शेअर बाजारात दिसले. बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये 600 पॉइंट वाढ दिसली. निफ्टीनेही 25,000 पॉइंटचा टप्पा पार केला. बाजारात तेजी असताना अनिल अंबानी यांच्याकडे पैशांचा पाऊस पडू लागला आहे. अनिल अंबानी यांच्या मालकीच्या कंपनीचे शेअर वधारले आहे. रिलायन्स पॉवरचे शेअर विक्रमी पातळीवर पोहचले आहे.
शेअर बाजारातील तेजीचा फायदा अनिल अंबानी यांना मिळत आहे. गेल्या काही दिवसांत रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर चांगलेच वधारले आहे. सोमवारी बाजार उघडताच रिलायन्स पॉवर कंपनीचा शेअरमध्ये चार टक्के वाढ झाली. हा शेअर 54.04 रुपयांवर जाऊन पोहचला आहे. यामुळे कंपनीचे बाजार मुल्यांकन 21,792.07 कोटी झाले आहे.
गेल्या काही दिवसांत अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर, रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चर या तीन कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. या तीन कंपन्यांपैकी रिलायन्स पॉवरमध्ये सर्वाधिक तेजी आहे. शुक्रवारी एकाच दिवसात 19 टक्के वाढ या शेअरमध्ये झाली होती. त्यानंतर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. रिलायन्स होम फायनान्सच्या शेअरमध्ये दहा टक्के वाढ झाली. हा शेअर शुक्रवारी 3.64 रुपयांवर गेला. सोमवारी त्यात पुन्हा दहा टक्के वाढ झाली. रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरच्या शेअरमध्येही 10.5 टक्के वाढ झाली होती. हा शेअर 313 रुपयांवर गेला होता.
रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये वाढ का?
अनिल अंबानी यांच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसांत वाढ होत आहे. त्यातच रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या शेअरने मागील काही दिवसांत चांगली कामगिरी केली आहे. कारण या कंपन्यांचे धोरण, भविष्यातील योजना आणि आर्थिक परिस्थिती चांगली होत आहे.
रिलायन्स पॉवर स्वत: विजेचे उत्पादन करत नाही. परंतु प्रमुख री-न्यूएबल एनर्जी प्लेयर म्हणून काम करते. नुकतीच या कंपनीची सब्सिडियरी NU Suntech ने 25 वर्षांसाठी 930 MW सोलर पॉवर आणि 1860 MWh बॅटरी स्टोरेजचा करार केला. 10,000 हजार कोटींचा हा प्रकल्प आशियातील सर्वात मोठा सोलर+स्टोरेज प्लँट असणार आहे.
