प्रसिद्ध उद्योगपतीचे संसारावर पाणी, पत्नीला पोटगीत देणार 8745 कोटी, पण ठेवली ही अट

Gautam Singhania | गौतम सिंघानिया यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांच्यात काडीमोड होण्याची चर्चा रंगली आहे. यापूर्वी दिवाळीच्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होऊ दिले नाही म्हणून गजहब उडाला. नवाज यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला होता. आता त्यांनी घटस्फोटासाठी 11,660 कोटींच्या संपत्तीमधून 8745 कोटी रुपये मागितले आहे. पण गौतम यांनी ही अट ठेवली आहे.

प्रसिद्ध उद्योगपतीचे संसारावर पाणी, पत्नीला पोटगीत देणार 8745 कोटी, पण ठेवली ही अट
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 9:32 AM

नवी दिल्ली | 21 नोव्हेंबर 2023 : अब्जाधीश उद्योगपती गौतम सिंघानिया आणि पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांच्यात एकमेकांविषयी कडवटपणा आला आहे. दिवाळीतच दोघांनी भांडणाचा मुहूर्त साधला. त्याविषयीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर सिंघानिया कुटुंबियांसोबत नवाज या दिवाळी साजरी करताना दिसल्या. हे जोडपे आता काडीमोड घेणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यासाठी नवाज यांनी पती गौतम सिंघानिया यांच्याकडे पोटगीच्या रुपात त्यांच्या एकूण संपत्तीपैकी 75 टक्के वाटा मागितल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. काय आहे हे प्रकरण…

पत्नीने मागितले 8745 कोटी

या पती-पत्नीत गेल्या काही दिवसांपासून अलबेल नसल्याचे समोर आले होते. त्यानंतर गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पत्नीपासून फारकत घेत असल्याचा दावा केला. आता घटस्फोटासाठी पत्नी नवाज यांनी भलीमोठी रक्कम मागितल्याचे समोर येत आहे. याप्रकरणातील एका व्यक्तीने ईटीला याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, नवाज यांनी पतीच्या एकूण 11,660 कोटींच्या संपत्तीत 75% टक्के वाटा मागितला आहे. ही रक्कम 8745 कोटी रुपये होते. यामध्ये दोन मुली निहारिका आणि निसा आणि नवाज यांचा वाटा असेल.

हे सुद्धा वाचा

गौतम सिंघानिया सहमत

गौतम सिंघानिया यांना ही मागणी मान्य असल्याचे समोर येत आहे. नवाज यांच्यापासून त्यांना घटस्फोट हवा आहे. पती-पत्नीत बेबनाव असल्याची पहिल्यांदा जाहीरपणे त्यांनीच कबुली दिली. तर ही पोस्ट लिहिण्याअगोदरच नवाज यांनी रेमंडच्या परिसरात आंदोलन केले होते. ते समाज माध्यमावर व्हायरल झाले होते.

ही ठेवली अट

गौतम सिंघानिया यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना संपत्तीत वारसा हक्काने वाटा मिळेल. पण ही अट नवाज यांना मान्य नाही. सध्या रेमंड समूहात अनेक ट्रस्ट आहेत. त्यात जे. के. ट्रस्ट आणि सुनीती देवी सिंघानिया हॉस्पिटल ट्रस्ट हे प्रमुख आहेत. या सर्व ट्रस्टवर सध्या गौतम सिंघानिया यांचे नियंत्रण आहे. ते ट्रस्टचे चेअरमन आणि मॅनेजिंग ट्रस्टी तर पत्नी नवाज या सदस्य आहेत.

काय आहे प्रकरण

दिवाळीत रेमंड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी हा मोठा बॉम्ब फोडला होता. पत्नी नवाज मोदी सिंघानिया हिच्यासोबतचा 32 वर्षांचा सुखी संसार मोडीत काढल्याचे त्यांनी जगजाहीर केले.   पत्नीपासून फारकतीचा निर्णय त्यांनी सांगितला. तर त्यांच्या पत्नीने पण आरोपांची राळ उडवली. रेमंड समूहाच्या दिवाळीच्या पार्टीत आमंत्रण देण्यात आले, पण त्यांना प्रवेश देण्यात आला नाही असा आरोप त्यांनी एका व्हिडिओत केला. हा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत त्या आंदोलन करताना दिसून आल्या.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...