AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

300 युनिट वीज मिळवा मोफत! PM Surya Ghar Yojana साठी असा करा अर्ज

PM Surya Ghar Yojana | बजेटमध्ये सौरऊर्जा योजनेची घोषणा करण्यात आली. देशातील एक कोटी घरांवर सोलर पॅनल बसविण्याच्या या योजनेविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. या योजनेत वीज विक्री करुन वार्षिक 18,000 रुपयांचा फायदा होणार आहे. कशी आहे ही योजना, कसा करणार अर्ज, जाणून घ्या...

300 युनिट वीज मिळवा मोफत! PM Surya Ghar Yojana साठी असा करा अर्ज
| Updated on: Feb 16, 2024 | 9:30 AM
Share

नवी दिल्ली | 16 February 2024 : 1 फेब्रुवारी रोजी निर्मला सीतारमण यांनी अंतरिम बजेटमध्ये सौरऊर्जा योजनेची घोषणा केली होती. पीएम सूर्योदय योजनेची (PM Suryoday Yojana) घोषणा करण्यात आली होती. त्यातंर्गत ग्राहक त्यांच्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावल्यास 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे. त्यातून त्यांना वार्षिक 18,000 रुपयांचा फायदा होणार आहे. पंतप्रधानांनी या योजनेची घोषणा 22 जानेवारी रोजी केली होती. सरकारने या मोफत इलेक्ट्रिसिटी योजनेला पीएम सूर्य घर योजना (PM Surya Ghar Yojana) असे नाव देण्यात आले आहे. या योजनेत कसा अर्ज करावा, त्यासाठी काय प्रक्रिया आहे, याविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. जाणून घ्या, काय आहे ही योजना?

मिळणार सबसिडी

  1. PM Surya Ghar Yojana ग्राहकांना सबसिडी मिळणार
  2. ग्राहकांना या योजनेतंर्गत 300 युनिट वीज मोफत मिळणार
  3. अधिक वीज उत्पादन झाले तर त्यातून 18000 रुपयांपर्यंत कमाई करता येईल
  4. या योजनेसाठी केंद्र सरकारने 75000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे
  5. बँकेत या योजनेसाठी कर्ज मागितल्यास त्यावर ग्राहकांना सवलत पण मिळणार
  6. या योजनेसाठी ग्राहकांना ऑनलाईन अर्ज करता येईल
  7. अर्ज करण्यासाठी ग्राहकांना https://pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल
  8. Rooftop Solar Scheme या पर्यायावर क्लिक करावे लागेल

या नागरिकांना योजनेचा फायदा

सूर्योदय योजनेतंर्गत सरकार एक कोटी घरांवर सौर ऊर्जेसाठी पॅनल बसवणार आहे. त्यासाठी बजेटमध्ये घोषणा करण्यात आली आहे. सोलर पॅनलच्या मदतीने मोफत वीज मिळेल. ज्यांच्या घरावरील छतावर सोलर पॅनल बसविता येणार आहे, त्या कुटुंबांना या योजनेत सहभागी करुन घेण्यात येणार आहे. ही योजना गरीब आणि मध्यमवर्गासाठी आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1.50 लाखांपेक्षा कमी आहे. त्यांना फायदा होईल.

कोणाला करता येईल अर्ज

  • कोणताही भारतीय नागरीक, संस्था
  • स्वतःचे घर हवे आणि त्यावर मोकळी जागा हवी
  • हे घर मजबूत आणि छतावर सहज सोलर पॅनल बसविता येण्याची सुविधा असावी
  • अर्जदाराकडे वीज जोडणी असावी

असा करा अर्ज

  • https://pmsuryaghar.gov.in/consumerRegistration वर जा
  • या ठिकाणी नाव, पत्ता आणि इतर संपूर्ण तपशील भरा
  • या ठिकाणी सबसिडी किती मिळणार हे पण तपासता येईल
  • भविष्यात या योजनेत केवळ घराच्या छतावरच नाही तर शेत, मोकळ्या जागेवर पण सोलर पॅनल लावतील
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.