मृत व्यक्तीच्या बँक खात्यामधून किंवा ATM कार्डातून पैसे काढल्यास काय होईल?

Bank | यावरून हे स्पष्ट होते की, पैसे काढणारी व्यक्ती मृत व्यक्तीची नॉमिनी असली तरीही, एटीएमद्वारे मृत व्यक्तीच्या बँक खात्यातून पैसे काढणे बेकायदेशीर आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याची मालमत्ता किंवा पैसे नामांकित व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित करण्याची कायदेशीर प्रक्रिया असते.

मृत व्यक्तीच्या बँक खात्यामधून किंवा ATM कार्डातून पैसे काढल्यास काय होईल?
नवीन वर्षात एटीएम पैसे काढण्यासाठी अधिक चार्ज द्यावा लागणार
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 11:39 AM

नवी दिल्ली: कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या बँक अकाऊंट आणि इतर कागदपत्रांचे काय करायचे, हा प्रश्न अनेकांना पडतो. संबंधित मृत व्यक्तीचे बँक खाते लवकरात लवकर बंद करणे गरजेचे असते. याबाबत रिझर्व्ह बँकेने काही निर्देश दिले आहेत. नुकतेच एक ताजे प्रकरण समोर आले आहे ज्यात पत्नीच्या मृत्यूनंतर एका व्यक्तीने एटीएमद्वारे तिच्या बँक खात्यातून पैसे काढले. पत्नीच्या मृत्यूशी संबंधित आवश्यक कागदपत्रे टाळण्यासाठी पतीने ही पद्धत शोधली. मात्र, हीच गोष्ट पतीला महागात पडली. तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करत बँकेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

यावरून हे स्पष्ट होते की, पैसे काढणारी व्यक्ती मृत व्यक्तीची नॉमिनी असली तरीही, एटीएमद्वारे मृत व्यक्तीच्या बँक खात्यातून पैसे काढणे बेकायदेशीर आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याची मालमत्ता किंवा पैसे नामांकित व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित करण्याची कायदेशीर प्रक्रिया असते.

काय आहे नियम?

कायदा असे सांगतो की अशी प्रकरणे बँकेची आणि इतर कायदेशीर वारसांची फसवणूक करतात. अशा स्थितीत पोलीस तक्रार नोंदवता येईल ज्याची चौकशी केली जाईल. या आरोपांच्या आधारे फौजदारी शिक्षा लागू होईल. जर मृत व्यक्तीने त्याच्या बँक खात्यात एकापेक्षा जास्त नॉमिनी केले असतील आणि त्यापैकी एकाला ते पैसे वापरायचे असतील तर त्याला इतर नामनिर्देशित व्यक्तीकडून संमतीपत्र घेऊन बँकेत दाखल करावे लागेल.

कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल?

जर एखाद्या व्यक्तीचे बँकेत खाते असेल आणि त्याचा मृत्यू झाला असेल तर मृत्यूचा दावा दाखल करण्यापूर्वी त्याच्या कुटुंबीयांनी काही खास गोष्टींची काळजी घ्यावी. मृत व्यक्तीचे बँक खाते संयुक्त खाते आहे की एकटे आहे ते शोधा. यानंतर नॉमिनीचे नाव बँक खात्यात नोंदवले गेले आहे की नाही हे शोधा. एखाद्या खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्याचे नातेवाईक बँक खात्यात ठेवलेल्या रकमेवर दावा करू शकतात.

बँक अकाऊंट कसे बंद कराल?

जर तुम्हाला बँक खाते बंद करायचे असेल, तर मृत व्यक्तीचे नोटराइज्ड मृत्यू प्रमाणपत्र द्यावे लागेल. स्थानिक नगरपालिका संस्थेत मृत्यू प्रमाणपत्र सहज बनवता येते. जर नामनिर्देशित असेल तर त्याला सर्व पैसे मिळतील, जो ते वारसदाराकडे सोपवतील. परंतु नामनिर्देशित व्यक्ती नसल्यास, वारस असलेल्या कुटुंबातील सदस्याला मृत्यू प्रमाणपत्रासह स्वतःच्या आणि मृत व्यक्तीच्या नातेसंबंधाशी संबंधित कागदपत्रे बँकेत सादर करावी लागतील. बँक नुकसानभरपाई बाँड देखील मागू शकते.

कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर बँकेला माहिती देण्यासाठी निश्चित कालमर्यादा नाही. जेव्हा पीडितेचे कुटुंब मानसिकदृष्ट्या तयार असेल तेव्हा हे काम करता येईल. रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार, जर कुटुंबातील सदस्यांनी पैसे काढण्यासाठी अर्ज केला तर बँकेला ते 15 दिवसांत पूर्ण करावे लागेल.

इतर बातम्या:

फक्त एका क्लिकवर डाऊनलोड करा नवं आधारकार्ड, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आधार कार्ड, पॅनकार्ड, व्होटिंग कार्ड रद्द कसे होते, जाणून घ्या सर्वकाही

आधार कार्ड व्हेरिफिकेशन ऑफलाईन कशाप्रकारे कराल, जाणून घ्या सर्वकाही

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.