AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asian paint : एशियन पेंट झाले बेरंग! मालक अश्विन दाणी यांचे निधन

Asian paint : एशियन पेंटचे सहसंस्थापक अश्विन दाणी यांचे निधन झाले. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. देशासह जगातील अनेक घरांना त्यांच्या रंगांनी शोभा आणली. ते दिग्गज भारतीय उद्योगपतींपैकी एक होते. ते कंपनीचे नॉन एक्झिक्युटिव्ह संचालक होते. त्यांचा मुलगा मालव आता संचालक मंडळाचा सदस्य आहे.

Asian paint : एशियन पेंट झाले बेरंग! मालक अश्विन दाणी यांचे निधन
| Updated on: Sep 28, 2023 | 3:51 PM
Share

नवी दिल्ली | 28 सप्टेंबर 2023 : एशियन पेंटचे सहसंस्थापक अश्विन दाणी यांचे निधन (Ashwin Dani Passes Away) झाले. त्यांनी वयाच्या 79 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ही कंपनीसाठी मोठी हानी आहे. त्यांचे मार्गदर्शन, व्यवस्थापनाखाली कंपनीने गगन भरारी घेतली. एशियन पेंट केवळ भारताचीच नाही तर आशियातील मोठी रंग कंपनी ठरली. देशासह जगातील अनेक घरांना रंगरंगोटीसाठी या पेंट्चा वापर करण्यात येतो. ते कंपनीचे नॉन एक्झिक्युटिव्ह संचालक होते. ते कंपनीत 1968 साली दाखल झाले होते. त्यांचे वडील आणि इतर तिघांनी स्वातंत्र्यपूर्व काळात, 1942 साली एशियन पेंटची स्थापना केली होती. त्यांच्या निधनाची वार्ता धडकताच शेअर बाजारात एशियन पेंटच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली.

रंगांवर होते विशेष प्रेम

दाणी यांच्या वडिलांनी तिघांसोबत एशियन पेंट कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. 1942 साली ही कंपनी अस्तित्वात आली. 1968 साली अश्विनी दाणी कंपनीत रुजू झाले. त्यांना लहानपणापासूनच रंगांचे वेड होते. त्यांचे आयुष्यभर रंगावर प्रयोग सुरु होते. रंगावर विशेष प्रेम असल्याने त्यांनी याच क्षेत्राचे शिक्षण घेतले. त्यांनी the technology of paints, pigments and varnishes या विषयाची विशेष पदवी संपादित केली. Polymer Science मध्ये पुढील शिक्षणासाठी ते ओहियोतील University of Akron येथे दाखल झाले. एवढ्यावरच ते थांबले नाही. त्यांनी न्यूयॉर्क येथील Rensselaer Polytechnic येथून Diploma in Colour Science ही खास पदविका पण मिळवली.

कोट्यवधी संपत्तीचे मालक

अश्विन दाणी यांनी एशियन पेंट्ला नवीन उंचीवर नेऊन ठेवले. काही दशकातच कंपनीने मोठा पल्ला गाठला. नावाप्रमाणे कंपनीने एशियन बाजारातच नाही तर जागतिक बाजारात दबदबा तयार केला. जपानी आणि कोरियन कंपन्यांना थोपवले. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, ते 7.1 अब्ज डॉलर संपत्तीचे मालक होते.

शेअरमध्ये घसरण

अश्विनी दाणी यांच्या निधनाचे वृत्त धडकताच शेअर बाजारात या कंपनीचा शेअर घसरला. कंपनीच्या शेअरमध्ये 4 टक्क्यांची घसरण दिसून आली. एशियन पेंट्चा शेअर दुपारी 2:30 वाजता 3,162.10 प्रति शेअरवर ट्रेड करत होता. कंपनीच्या शेअरमध्ये या घडामोडीमुळे घसरण दिसून आली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.