Watch company | महागड्या घड्याळ विक्री करणार्‍या कंपनीमुळे गुंतवणूकदारांवर वाईट वेळ, किती झाले नुकसान?

शेअर बाजारात एथोसची अतिशय सुमार कामगिरीने सुरुवात झाली. एनएसईवर 6 टक़्के डिस्काउंटवर 825 रुपयांवर लिस्टींग झाली. तर बीएसईवर हाच शेअर 5.4 टक्के डिस्काउंटसह 830 रुपयांवर लिस्टेड होता. याचा इश्‍यू प्राईस 878 रुपये प्रतिशेअर होता.

Watch company | महागड्या घड्याळ विक्री करणार्‍या कंपनीमुळे गुंतवणूकदारांवर वाईट वेळ, किती झाले नुकसान?
महागड्या घड्याळ विक्री करणार्‍या कंपनीमुळे गुंतवणूकदारांवर वाईट वेळ
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 12:47 PM

लग्झरियस घड्याळी विकणारी कंपनी एथोस लिमिटेडचे (Athos) शेअर सोमवारी (30 मे) रोजी शेअर बाजारात लिस्टेड झाले. एथोस लिमिटेडच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना चांगलेच निराश केले आहे. शेअर बाजारात एथोसची एकदम सुमार कामगिरीने सुरुवात झाली. एनएसईवर (NSE) 6 टक्के डिस्काउंटवर 825 रुपयेवर लिस्टींग झाले. तर बीएसईवर (BSE) हाच शेअर 5.4 टक्के डिस्काउंटसह 830 रुपयांवर लिस्ट झाला. याचा इश्‍यू प्राईस 878 रुपये प्रतिशेअर होता. लिस्टिंगनंतर शेअरमध्ये पडझड वाढली आणि सरते शेवटी हा शेअर 792 रुपयांच्या तळाला जाउन पोहचला. कंपनीचे मार्केट कॅप 1,856.38 कोटी रुपये आहे. कंपनीच्या गुंतवणूकदारांना एका शेअरवर 53 रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. आईपीओअंतर्गत 375 कोटी रुपयांचे इक्विटी शेअरर्सची फ्रेश ऑफरिंग आणि 1,108.037 इक्विटी शेअरर्सचे ऑफर फॉर सेल यांचा सहभाग होता. एथोस आईपीओपासून मिळवलेल्या रकमेचा वापर कर्जाची परतफेड, नवीन स्टोअर उघडणे तसेच सामान्य कॉर्पोरेट उद्देशांना पूर्ण करण्यासाठी करण्यात येणार आहे.

लग्झरी आणि प्रीमिअम वॉच रिटेलमध्ये भागीदारी

भारतातील लग्झरी आणि प्रीमिअम वॉच रिटेल सेगमेंटमध्ये कंपनीची चांगली भागीदारी आहे. प्रीमिअम सेगमेंटमध्ये एकूण रिटेल सेल्समध्ये कंपनीची 13 टक्के भागीदारी आहे. तर आर्थिक वर्ष 2020 मध्ये लग्झरी सेगमेंटमध्ये कंपनीची 20 टक्के भागीदारी होती. कंपनीच्या मल्टी-स्टोर फॉर्मेटमध्ये भारताची 17 शहरांमध्ये 50 फिजिकल रिटेल स्टोर आहे. हे आपले प्रोडक्ट वेबसाइट आणि सोशल मीडिया प्लेटफार्मच्या माध्यमातून ग्राहकांना विकणार आहे.  एथोसचा आयपीओचा गैर संस्थागत गुंतवणूकदारांचा वाटा 1.48 टक्के सब्सक्राइब झाला होता. दुसरीकडे क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल बायर्सचा वाटा 1.06 आणि रिटेल इंडिव्हीज्यूअल इन्वेस्टर्सचा वाटा 84 टक़्के होता.

प्रीमिअम आणि लग्झरी घड्याळ्यांचा सर्वाधिक पोर्टफोलिओ

एथोसजवळ भारतातील प्रीमिअम आणि लग्झरी घडाळ्यांचा सर्वाधिक पोर्टफोलियो आहे. आणि 50 प्रीमिअम आणि लग्झरी वॉचची स्वत: विक्री करण्यात येत असते. कंपनीच्या ब्रँडमध्ये Omega, IWC Schaffhaisen, Jaeger LeCoultre, Panerai, Bvlgari, H.Moser and Cio, Rado, Longiner, Baume and Mercier, Oris SA, Corum, Carl Bucherer, Tissot, Raymond Weil, Lousis Moinet आणि Bakmain आदींचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.