Atiq Ahmed : भूमाफिया सोडून गेला अपार संपत्ती, सोन्या-चांदीचा तर हिशोबच नाही

Atiq Ahmed : भूमाफिया ते संसदेपर्यंत प्रवास करणारा माजी खासदार अतिक अहमद त्याच्या पाठीमागे अपार संपत्ती सोडून गेला आहे. त्याच्याकडील सोने-चांदीची तर मोजदाद नाही.

Atiq Ahmed : भूमाफिया सोडून गेला अपार संपत्ती, सोन्या-चांदीचा तर हिशोबच नाही
Atique Ahmed
Follow us
| Updated on: Apr 16, 2023 | 11:00 AM

नवी दिल्ली : भूमाफिया ते संसदेपर्यंत प्रवास करणाऱ्या अतिक अहमदवर ( Atiq Ahmed) शनिवारी रात्री अगदी जवळून अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. त्यात तो आणि त्याचा भाऊ घटनास्थळीच ठार झाले. खालिद अजिम अशरफ असे त्याच्या भावाचे नाव आहे. गेल्या एक महिन्यापासून उत्तर प्रदेशमध्ये उमेश पाल हत्याकांडानंतर मोठ्या घडामोडी आणि सूडाग्नी भडकला. त्यात पोलिसांसह दोन्ही गटातील काहींचा खून झाला आहे. अतिक अहमद याने मोठी माया जमवली होती. त्याच्या घराची, कार्यालयाची झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडे अनेक बेहिशोबी मालमत्ता, जमिनीची कागदपत्रे सापडली. अहमद त्याच्या पाठीमागे अपार संपत्ती सोडून गेला. त्याच्याकडील सोने-चांदीची (Gold Silver Asset Value) तर मोजदाद नाही.

शनिवारी रात्री घटना घडली अतिक अहमद आणि त्याच्या भावाची हत्या शनिवारी रात्री घडली. स्थानिक पोलिस दोघांना मेडिकल चेकअपसाठी घेऊन आले होते. त्यावेळी त्याच्यासह भावावर हल्ला करण्यात आला. त्याच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या. अतिक अहमद हा समाजवादी पार्टीच्या तिकिटावर 2004 ते 2009 या काळात खासदार झाला होता. 2014 मधील लोकसभा निवडणूक ही त्याने लढवली होती. त्यावेळी त्याने शपथपत्र दाखल केले. त्यात त्याच्या संपत्तीची माहिती देण्यात आली आहे.

1.5 किलोपेक्षा अधिकचे सोने निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात अतिकने त्याच्या संपत्तीचे विवरण दिले आहे. 2014 मध्ये त्याच्याकडे 1750 ग्रॅम सोन्याचे दागिने होते. त्यावेळी त्याची किंमत 52.50 लाख रुपये होती. सोन्याच्या सध्याच्या भावाचा विचार करता, आता या सोन्याची किंमत 1.07 कोटींच्या घरात पोहचली आहे.

हे सुद्धा वाचा

3.8 किलो चांदी अतिक अहमदकडे सोन्यासोबतच चांदीचा मोठा साठा आहे. त्याच्याकडे 3.8 किलो चांदी असल्याचा दावा त्याने प्रतिज्ञापत्रात केला होता. त्यावेळी चांदीच्या बाजाराभावानुसार, त्याच्याकडे 1.71 लाख रुपयांची चांदी होती. सध्याच्या बाजाराभावानुसार ही चांदी 2.93 लाख रुपयांच्या घरात आहे.

11,000 कोटींची मालमत्ता याप्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिक आणि त्याच्या कुटुंबाकडे एकूण 11,000 कोटींहून अधिकची संपत्ती असून ही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. 2014 मधील प्रतिज्ञापत्रानुसार, त्याच्याकडे एकूण 25 कोटींची संपत्ती होती. गेल्या काही वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. अतिक आणि त्याच्या कुटुंबियांनी अनेकांना धमकावून जमिनी बळकावल्याचा इतर गुन्हेगारी कृत्यातून अमाप संपत्ती कमाविल्याचा आरोप करण्यात येत आहे.

अतिक अहमदची दहशत भूमाफिया पासून ते थेट देशाच्या कायदेमंडळापर्यंत अतिकने प्रवास केला. त्याच्या कुटुंबाविरोधात उत्तर प्रदेशात एकूण 150 हून अधिक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यात खून, अपहरण, जमिनी, मालमत्ता बळकावणे यांचा समावेश आहे. अतिक अहमदविरोधातच 100 हून अधिक प्रकरणे दाखल आहेत. उमेश पाल हत्याकांडानंतर दुसऱ्या गटातील लोक त्याच्या जीवावर उठले होते. त्याच्या मुलासह शॉर्प शूटरचा झांशी येथे एन्काऊंटर झाले.

Non Stop LIVE Update
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?.
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?.
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.