Baal Aadhaar | लहान मुलांसाठी विशेष आधारकार्ड, जाणून घ्या बनविण्याची संपूर्ण प्रक्रिया

| Updated on: Apr 02, 2021 | 1:25 PM

लहान मुलांचे आधारकार्ड आई-वडिलांपैकी एकाच्या आधार कार्डला लिंक केले जाते. (Child Baal Aadhaar Enrolment Details)

Baal Aadhaar | लहान मुलांसाठी विशेष आधारकार्ड, जाणून घ्या बनविण्याची संपूर्ण प्रक्रिया
Child Baal Aadhaar
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण (UIDAI) या आधारकार्ड बनवणाऱ्या संस्थेने लहान मुलांना आधारकार्ड बनवण्याची सुविधा दिली आहे. यानुसार तुम्ही नवजात मुलांसाठी आधार कार्डदेखील बनवू शकता. UIDAI कडून लहान मुलांसाठी निळ्या रंगाचे आधारकार्ड जारी केले जाते. याला बाल आधार (Baal Aadhaar) असे देखील म्हणतात. लहान मुलांचे आधारकार्ड आई-वडिलांपैकी एकाच्या आधार कार्डला लिंक केले जाते. (Child Baal Aadhaar Enrolment Details)

आई किंवा वडिलांच्या आधारकार्डशी लिंक असणार

जर तुमच्या मुलाचे वय 5 वर्षांपेक्षा कमी असेल आणि जर तुम्हाला त्याचे आधारकार्ड बनवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला UIDAI वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. बाल आधारकार्डासाठी मुलाच्या जन्माचा दाखला (Birth Certificate) असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे या आधारकार्डदरम्यान लहान मुलांचे कोणतेही बायोमेट्रिक तपशील घेतले जाणार नाहीत. तसेच हे आधारकार्ड आई किंवा वडिलांच्या आधारकार्डशी लिंक असणार आहे.

फक्त फोटो घेतले जाणार

5 वर्षाखालील कमी वयाच्या मुलांचे बायोमेट्रिक्स आणि डोळ्यांचे Pupil विकसित झालेले नसतात. त्यामुळे लहान मुलांच्या आधार नोंदणीदरम्यान बायोमेट्रिक तपशील घेतले जात नाहीत. फक्त त्यांचे फोटो घेतले जाणार आहे. ते मूल पाच वर्षाचे झाल्यानंतर त्यांचे बायोमेट्रिक्स तपशील घेतले जातात.

बायोमेट्रिक्सचे अपडेट विनामूल्य

आधार कार्डमुळे तुमच्या मुलाला एक विशिष्ट ओळख निर्माण होईल. त्यामुळे तुम्ही नवजात मुलाचेही आधारकार्ड बनवू शकता. विशेष म्हणजे लहान मुलांच्या आधारकार्डाचे बायोमेट्रिक्सचे अपडेट हे विनामूल्य केले जाते. यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही.

पाच वर्षानंतर आधार कार्ड अवैध

विशेष म्हणजे लहान मुलं हे पाच वर्षाचे झाल्यानंतर निळ्या रंगाचे आधार कार्ड अवैध होते. त्यामुळे मुलाला त्याच्या आधार कार्डासह जवळच्या आधार केंद्रावर जाऊन बायोमेट्रीक करावी लागते. त्यानंतर त्याला नवीन आधार कार्ड मिळते.

बायोमेट्रिकशिवाय आधार कार्ड बनवता येईल का?

असे बरेच दिव्यांग आहेत ज्यांचे हात किंवा बोटं नाहीत. किंवा अनेक लोकांच्या आजारामुळे बायोमेट्रिक ट्रेसिंग येत नाहीत. अशा परिस्थितीतही आधार कार्ड बनवण्याची तरतूद आहे. बोट आणि रेटीना नसतानाही किंवा दोन्हीही नसले तरीही आपण आधारसाठी नोंदणी करू शकता. आधार सॉफ्टवेअरमध्ये असे अपवाद स्वीकारण्याची तरतूद आहे. (Child Baal Aadhaar Enrolment Details)

संबंधित बातम्या : 

‘हे’ रेस्टॉरंट हेलिकॉप्टरने फूड डिलिव्हरी करणार? सोशल मीडियावर जाहिरात

उन्हाळा सुरु झाला, ‘या’ व्यवसायात कमी गुंतवणुकीत मोठी कमाई करा, वाचा सविस्तर

LIC Jeevan Umang Policy : दर महिना 1302 रुपयांची गुंतवणूक करा, 28 लाख रुपयांपर्यंत रिटर्न मिळवा!