AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Ramdev : शेअर बाजारात पतंजली फुड्सचा मनी ‘योगा’; रामदेव बाबांच्या या कंपनीवर गुंतवणूकदारांच्या उड्या

Patanjali Foods Share : पतंजली फूड्सनुसार चालू आर्थिक वर्षात, एप्रिल-जून या तिमाहीत एकल आधारावर कंपनीचा नेट प्रॉफिट तीन पट वाढला. हा नफा 262.90 कोटींच्या घरात पोहचला आहे. एका वर्षापूर्वी नफ्याचा आकडा 87.75 कोटी रुपये होता.

Baba Ramdev : शेअर बाजारात पतंजली फुड्सचा मनी 'योगा'; रामदेव बाबांच्या या कंपनीवर गुंतवणूकदारांच्या उड्या
बाबा रामदेव यांच्या शेअरने केली कमाल
| Updated on: Aug 21, 2024 | 3:58 PM
Share

शेअर बाजारात चढउताराचे सत्र सुरु असले तरी बुधवारी काही कंपन्यांचे शेअर रॉकेट ठरले. योगगुरु रामदेव बाबा यांची कंपनी पतंजली फूड्स लिमिटेडचा शेअर असाच वधारला. या शेअरमध्ये 5 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसली. तर भाव 1913.35 रुपयांपर्यंत पोहचला. हा शेअर 52 आठवड्यातील उच्चांकावर पोहचला. या शेअरबद्दल बाजारातील ब्रोकरेज फर्म आशावादी आहेत. हा शेअर तुफान तेजीत असेल, असा दावा करण्यात येत आहे.

ब्रोकरेज फर्मचा काय सल्ला

ब्रोकरेज Systematix ने पतंजली फूड्स लिमिटेडचा शेअर खरेदीसाठी अनुकूलता दाखवली आहे. हा शेअर 2259 रुपयांपर्यंत उसळी घेण्याचा दावा या ब्रोकरेज फर्मने केला आहे. या शेअरमध्ये 20 टक्क्यांपेक्षा अधिकच्या वाढीचा अंदाज आहे. खाद्य तेल व्यवसायात पतंजली फूड्स आक्रमक दिसत आहे. कंपनीने त्यासाठी नवीन धोरण ठरवले आहे. पतंजली खाद्य उद्योगात मोठी कामगिरी बजावण्याच्या तयारीत आहे.

कंपनीचा तिमाही अंदाज काय

पतंजली फूड्सनुसार, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून तिमाहीत एकल आधारावर कंपनीचा नेट प्रॉफिट तीन पट होऊन 262.90 कोटी रुपये झाला. एक वर्षापूर्वी याच समान तिमाहीत या कंपनीचा फायदा 87.75 कोटी रुपये होता. कमी उत्पन्न असताना पण या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीला फायदा झाला आहे. तर एकूण उत्पन्नात घसरण होऊन या आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत 7,202.35 कोटी रुपयांवर आले आहे. एक वर्षापूर्वी याच तिमाहीत महसूली आकडा 7,810.50 कोटी रुपये होता. गेल्या काही दिवसांपासून पतंजली फूड्‍सने खाद्यतेल बाजारात उभारी घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

तर कोल्हापूरच्या साडी तयार करणारी कंपनी सरस्वती साडी डिपोचा शेअर BSE वर 200 रुपयांवर सूचीबद्ध झाला. तर आयपीओमध्ये या शेअरची किंमत 160 रुपये प्रति शेअर होता. एका स्टॉकमागे गुंतवणूकदारांना 40 रुपयांचा फायदा झाला. ज्या गुंतवणूकदारांनी या आयपीओत दोन लाख रुपये गुंतवले. त्यांना अवघ्या 4 दिवसांत 2.50 लाखांचा परतावा मिळाला. चारच दिवसांत 50 हजारांची लॉटरी लागली.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं