Bank Holidays: बँकेची कामं लवकर आटपून घ्या; पुढचे 7 दिवस बँका बंद राहणार

जाणून घ्या बँका कधी बंद आणि कधी सुरु राहणार | Bank Holidays in March and April

Bank Holidays:  बँकेची कामं लवकर आटपून घ्या; पुढचे 7 दिवस बँका बंद राहणार
27 मार्च ते 29 मार्च या काळात सार्वजनिक आणि खासगी बँका बंद राहतील.
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 12:08 PM

मुंबई: बँकेत तुमचे एखादे महत्त्वाचे काम असेल तर आता तुम्हाला येत्या दोन दिवसांमध्ये हे काम आटपून घ्यावे लागणार आहे. कारण, त्यानंतर पुढील 7 दिवस बँका बंद (Bank Holiday) राहणार आहेत. 27 मार्च ते 29 मार्चपर्यंत बँकांना सुट्टी आहे. त्यानंतर फक्त 30 मार्च आणि 3 एप्रिल हे दोन दिवसच बँकेतील दैनंदिन कामकाज सुरु राहील. त्यामुळे बँकेत एखादे महत्त्वाचे काम असल्यात तुम्हाला घाई करावी लागणार आहे. (Banks will remain closed on these days due to year ending)

बँका का बंद राहणार?

महिन्यातील चौथा शनिवार आणि होळीच्या सणासाठी 27 मार्च ते 29 मार्च या काळात सार्वजनिक आणि खासगी बँका बंद राहतील. त्यानंतर 31 मार्चला बँकांना सुट्टी नाही. मात्र, आर्थिक वर्ष संपत असल्याने इयर एडिंगच्या कामांसाठी बँकेचे दैनंदिन कामकाज बंद असेल. त्यामुळे ग्राहकांना व्यवहार करण्यासाठी 30 मार्च आणि 3 एप्रिल हे फक्त दोन दिवस उपलब्ध असतील. मात्र, इयर एडिंगच्या वर्क लोडमुळे या दोन दिवसांमध्येही बँकांमध्ये कितपत कामकाज होईल, याबाबत शंका आहे.

बँका कधी बंद आणि कधी सुरु राहणार?

27 मार्च – महिन्यातील शेवटचा शनिवार असल्याने बँका बंद राहतील. 28 मार्च – रविवार असल्याने बँक हॉलिडे असेल. 29 मार्च – होळीची सुट्टी असल्याने बँका बंद राहतील. 30 मार्च – यादिवशी बँका सुरु राहतील, पण पाटण्यातील बँक व्यवहार बंदच राहतील. 31 मार्च – आर्थिक वर्ष संपत असल्याने दैनंदिन कामकाज होणार नाही. 1 एप्रिल – आर्थिक वर्ष संपत असल्याने दैनंदिन कामकाज होणार नाही. 2 एप्रिल – गुड फ्रायडेची सुट्टी असल्यामुळे बँका बंद राहतील. 3 एप्रिल – यादिवशी बँका सुरु राहतील. 4 एप्रिल – बँकांना रविवार आणि ईस्टर डेची सुट्टी असेल.

इतर बातम्या:

PF अकाऊंट ट्रान्सफर करायचं आहे तर जाणून घ्या सोपी पद्धत, EPFO ने सांगितली संपूर्ण प्रोसेस

विमाधारकांसाठी Good News! नियम आवडले नाही तर खरेदी केलेली पॉलिसी करू शकता रद्द, वाचा सविस्तर

LPG Gas Cylinder : 819 रुपयांचा सिलेंडर फक्त 119 रुपयांत मिळवा, वाचा संपूर्ण प्रोसेस

(Banks will remain closed on these days due to year ending)

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.