Bank of Baroda मध्ये नोकरीची संधी; अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत

बँकिंग क्षेत्रात करिअर घडवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदामध्ये मोठी नोकरभरती आहे. (Bank of Baroda Recruitment on Contract Basis for Digital Lending Department)

Bank of Baroda मध्ये नोकरीची संधी; अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत

नवी दिल्ली: बँकिंग क्षेत्रात करिअर घडवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदामध्ये मोठी नोकरभरती आहे. त्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. विशेष म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधाही बँकेने दिली आहे. (Bank of Baroda Recruitment on Contract Basis for Digital Lending Department)

बँक ऑफ बडोदामध्ये डिजीटल लेंडिंगशी संबंधित 13 पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानुसार वेगवेगळ्या पात्रतेच्या उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पदांसाठी तीन वर्षासाठी नियुक्ती केली जाणार आहे. मात्र, हे काँट्रॅक्ट नंतर वाढवण्यातही येणार आहे. 25 ते 45 वयोगटातील उमेदवारांना या पदांकरीता अर्ज करता येणार आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

या पदांसाठी भरती

  • डिजीटल रिस्क स्पेशालिस्ट
  • लीड डिजीटल बिझनेस पार्टनरशीप
  • लीड डिजीटल सेल्स
  • डिजीटल अॅनालिटिक्स स्पेशालिस्ट
  • इनोव्हेशन अँड इमर्जिंग टेक स्पेशालिस्ट
  • डिजीटल जर्नी स्पेशालिस्ट
  • डिजीटल सेल्स ऑफिसर
  • UI/UX Specialist
  • टेस्टिंग स्पेशालिस्ट

विभाग

बँक ऑफ बडोदा

पद

डिजीटल लेंडिंगशी संबंधित

एकूण पदे

13

पात्रता

पदानुसार पात्र उमेदवार निवडले जाणार

वयोमर्यादा

25 ते 45 वयोगटातील

अर्ज करण्याची शेवटची तारीख

30 नोव्हेंबर
3 वर्षाचं काँट्रक्ट असेल. त्यानंतर हा कालावधी वाढू शकतो.

संपर्क

www.bankofbaroda.in

अर्ज कसा कराल?

बँकेच्या www.bankofbaroda.co.in/careers.htm या संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांना नोंदणी करायची आहे. डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे अर्ज शुल्क भरून नोंदणी करू शकता. ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांना त्यांचा बायोडाटा अपलोड करावा लागणार आहे. स्कॅन केलेला फोटो आणि सही सुद्धा अपलोड करावी लागणार आहे.

शुल्क किती?

खुलावर्ग, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी उमेदवारांना अर्जासाठी 600 रुपये भरावे लागणार आहेत.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि पीडब्ल्यूडी गटातील उमेदवारांना 100 रुपये भरावे लागणार आहेत.

संबंधित बातम्या:

एक मुलाखत आणि थेट ऑफिसर, पगार तब्बल एक लाखांहून अधिक

कोरोना संकट काळातही ‘या’ क्षेत्राची भरारी, सप्टेंबरमध्ये 29 टक्के रोजगार उपलब्ध

(Bank of Baroda Recruitment on Contract Basis for Digital Lending Department)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *