चांगली बातमी! बँक ऑफ बडोदा विकतेय स्वस्त घरे, कधी होणार लिलाव?

इच्छुक बोलीदारांना बँक ऑफ बडोदा मेगा ई-लिलावासाठी ई-बक्रे पोर्टल https://ibapi.in/ वर नोंदणी करावी लागेल. या पोर्टलवर 'बिडर्स रजिस्ट्रेशन' वर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे नोंदणी करावी लागेल.

चांगली बातमी! बँक ऑफ बडोदा विकतेय स्वस्त घरे, कधी होणार लिलाव?

नवी दिल्ली : तुम्ही स्वस्त घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बँक ऑफ बडोदा तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आलीय, ज्यामध्ये तुम्हाला स्वस्तात निवासी मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. BOB या मालमत्तेचा लिलाव करणार आहे. 8 डिसेंबरपासून हा लिलाव सुरू होत आहे. याबाबतची माहिती IBAPI (Indian Banks Auctions Morgaged Properties Information) ने दिलीय.

लिलाव कधी होणार?

बँक ऑफ बडोदा (BOB) ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून याबाबत माहिती दिली. बँकेने ट्विटमध्ये लिहिले की, मेगा ई-लिलाव 8 डिसेंबर 2021 रोजी केला जाईल. यामध्ये निवासी आणि व्यावसायिक मालमत्तेचा ई-लिलाव केला जाणार आहे. तुम्ही येथे वाजवी किमतीत मालमत्ता खरेदी करू शकता.

कुठे नोंदणी करायची?

इच्छुक बोलीदारांना बँक ऑफ बडोदा मेगा ई-लिलावासाठी ई-बक्रे पोर्टल https://ibapi.in/ वर नोंदणी करावी लागेल. या पोर्टलवर ‘बिडर्स रजिस्ट्रेशन’ वर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे नोंदणी करावी लागेल.

केवायसी दस्तऐवज आवश्यक असेल

बोलीदाराला आवश्यक KYC कागदपत्रे अपलोड करावी लागतील. केवायसी कागदपत्रांची ई-लिलाव सेवा प्रदात्याद्वारे पडताळणी केली जाईल. यास 2 कार्य दिवस लागू शकतात.

अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा

मालमत्तेच्या लिलावाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही https://ibapi.in/https://www.bankofbaroda.in/e auction.html?utm_source=SM&utm_medium=Post&utm_campaign=MegaAuction_km या लिंकला भेट देऊ शकता.

बँका वेळोवेळी लिलाव करतात

मालमत्तेच्या मालकांनी त्यांच्या कर्जाची वेळेत परतफेड केलेली नाही किंवा काही कारणाने ते देऊ शकलेले नाहीत. त्या सर्व लोकांच्या जमिनी बँकांनी ताब्यात घेतल्यात. अशा मालमत्तांचा बँकांकडून वेळोवेळी लिलाव केला जातो. या लिलावात बँक मालमत्ता विकून आपली थकबाकी वसूल करते.

संबंधित बातम्या

काय सांगता! तुमच्याकडेही 500 रुपयांची जुनी नोट आहे, मग तुम्हाला 10 हजार मिळणार, पण कसे?

त्वरा करा! स्वस्त सोने खरेदीची आज शेवटची संधी, थेट RBI पोर्टलवरून जाणून घ्या किंमत

Published On - 3:56 pm, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI