AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Government School and Bank Holidays: सप्टेंबरमध्ये 15 दिवस बँका बंद राहणार, वाचा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Government School and Bank Holidays in September 2025: सप्टेंबरमधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर झाली आहे. सप्टेंबरमध्ये एकूण 15 बँका बंद राहणार आहेत. स्थानिक आणि राष्ट्रीय सण, आठवड्यातील सुट्ट्यांचाही यात समावेश आहे.

Government School and Bank Holidays: सप्टेंबरमध्ये 15 दिवस बँका बंद राहणार, वाचा सुट्ट्यांची संपूर्ण यादी
bank holiday in september
| Edited By: | Updated on: Sep 01, 2025 | 12:53 PM
Share

Government School and Bank Holidays in September: सप्टेंबरमधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर झाली आहे. सप्टेंबरमध्ये एकूण 15 बँका बंद राहणार आहेत. स्थानिक आणि राष्ट्रीय सण, आठवड्यातील सुट्ट्यांचाही यात समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे या सुट्ट्यांची संख्या प्रत्येक राज्यानुसार बदलणार आहे. सप्टेंबर महिन्यात कोणत्या राज्यात किती आणि कोणत्या दिवशी सुट्टी असणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

3 ते 5 सप्टेंबर

3 सप्टेंबर रोजी रांची आणि पटना शहरांमध्ये कर्मपूजेमुळे बँका बंद राहणार आहेत. तसेच ओणममुळे 4 सप्टेंबर रोजी त्रिवेंद्रम आणि कोची येथील बँका बंद राहणार आहेत. त्याचबरोबर 5 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद/मिलाद-उन-नबी/थिरुवोनम/मिलाद-ए-शरीफ या सणामुळे दिल्ली, मुंबईसह देशातील बहुतांशी भागातील बँका बंद राहणार आहेत.

6,7 आणि 12,13 सप्टेंबर

6 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद निमित्त जम्मू, श्रीनगर आणि गंगटोकमधील बँका बंद राहणार आहेत. 7 सप्टेंबर रोजी रविवार असल्याने देशभरात सर्व बँका बंद राहणार आहेत. तसेच 12 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद नंतरचा शुक्रवार आहे, त्यामुळे जम्मू आणि श्रीनगरमधील बँका बंद ठेवल्या जाणार आहेत. 13 सप्टेंबर रोजी महिन्याचा पहिला शनिवार असल्याने या दिवशीही देशभरातील बँका बंद राहणार आहेत.

14, 21, 22 आणि 23 सप्टेंबर

14 आणि 21 सप्टेंबर रोजी रविवार असल्याने देशभरातील सर्व बँकांना सुट्टी असणार आहे. तसेच 22 सप्टेंबर रोजी नवरात्री स्थापनेमुळे जयपूरमधील बँका बंद राहणार आहेत. 23 सप्टेंबर रोजी महाराजा हरि सिंह जयंती निमित्त जम्मूमधील बँका बंद राहणार आहेत.

27 ते 30 सप्टेंबर

महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने 27 सप्टेंबर रोजी देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत. तसेत 28 सप्टेंबर रोजी देशभरात रविवारची सुट्टी असणार आहे. 29 सप्टेंबर रोजी दुर्गापूजेमुळे कोलकाता, गुवाहाटी आणि श्रीनगरमधील बँका बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच 30 सप्टेंबर रोजी महाअष्टमी/दुर्गापूजेमुळे कोलकाता, त्रिपुरा आणि भुवनेश्वरसह इतरही अनेक शहरांमधील बँका बंद राहणार आहेत.

ऑनलाईन सेवा सुरु राहणार

सप्टेंबरमध्ये बँकांना 15 दिवस सुट्टी असली तर ऑनलाईन बँकिंग सेवा मात्र सुरु राहणार आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही तुम्ही आर्थिक व्यवहार करु शकणार आहात.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.