Bhim App : डिजिटल स्पर्धेत ‘भीम’ मागे, सरकार कमी पडले की वापरनं किचकट? जाणून घ्या…

ऑनलाईन व्यवहारात सध्या गुगल पे अ‍ॅपने 54 टक्के मार्केटवर ताबा मिळवला आहे. दुसऱ्या स्थानावर 11.9 टक्क्यांवर फोन पे आहे.

Bhim App : डिजिटल स्पर्धेत 'भीम' मागे, सरकार कमी पडले की वापरनं किचकट? जाणून घ्या...
डिजिटल स्पर्धेत 'भीम' मागेImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 10:31 AM

मुंबई : आता कोणताही व्यवहार करायचं असेल तर कुणीही रोख रक्कम वापरत नाही. किंवा पगार झाला की तो बँकेतून (Bank) देखील काढला जात नाही. फोन-पे (PhonePay) आणि गुगल पे (Google Pay) सारख्या ऑनलाईन व्यवहाराच्या सुविधा अल्याने आजकाल व्यवहार देखील ऑनलाइन झाले आहेत. आपण अगदी कितीही रुपयांचा व्यवहार अगदी सहज या अ‍ॅपमधून करू शकतो. त्याला कोणताही अडथळा येत नाही. मात्र, या डिजिटल स्पर्धेत केंद्र सरकारने तयार केलेलं भीम अ‍ॅप (Bhim App) मागे पडलंय. लोकांची या अ‍ॅपला फारशी पसंती नसल्याचं दिसतंय. सरकार या अ‍ॅपला युजर फ्रेंडली देखील करू शकलेलं नाही. त्यामुळे लोकांना अडचण आली की ते लगेच सोप्या आणि साध्या अ‍ॅपचा उपयोग करू लागतात. त्यामुळे गुगल पे आणि फोन पे हे दोन्ही अ‍ॅप वापरनं लोक जास्त पसंत करतायेत. दरम्यान, या डिजिटल युगात भीम अ‍ॅपचा प्रभाव चांगलाच कमी झाल्याचं दिसतयं.

काय आहे कारण?

डिजिटल व्यवहार वाढावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भीम अ‍ॅप सादर केलं होतं. विशेष म्हणजे हे अ‍ॅप इंटरनेटशिवाय देखील काम करतं. याला आधार कार्डची गरज असते. या अ‍ॅपच्या माध्यमातून लोकांना पैसे देता किंवा घेता येतात. परंतु लोक याचा फारसा वापर करताना दिसत नाहीत. एकीकडे डिजिटल व्यवहारांना पसंती मिळत आहे. मात्र, दुसरीकडे भीम अ‍ॅपला लोक फार पसंत करत नसल्याचं दिसतंय. ऑनलाईन व्यवहारांमध्ये दिवसागणिक वाढत होत आहे. 2022 मध्ये ऑनलाईन व्यवहारांचा आकडा एक हजार बिलियन डॉलरपर्यंत पोहोचलाय. ऑनलाईन व्यवहारांचा सर्वाधिक वापर प्रवासादरम्यान करण्यात येत आहे. ऑनलाईन व्यवहारात सध्या गुगल पे अ‍ॅपने 54 टक्के मार्केटवर ताबा मिळवला आहे. दुसऱ्या स्थानावर 11.9 टक्क्यांवर फोन पे आहे. तिसऱ्या स्थानावर 9.7 टक्के पेटीएम आहे. त्यानंतर 8.5 टक्क्यांवर व्हॉट्सअ‍ॅप आणि पाचव्या स्थानी म्हणजे शेवटी भीम अ‍ॅप आहे.

हे सुद्धा वाचा

भीम अ‍ॅपमध्ये काय सुधारणा व्हाव्यात?

  1. अ‍ॅप युजर फ्रेंडली असावं
  2. गेट वे मिळण्यात आडचणी आहेत, त्या दूर व्हाव्यात
  3. अ‍ॅप वापरताना कॅशबॅक सुविधा देखील द्याव्यात
  4. अ‍ॅपची अपेक्षित प्रसिद्धी गरजेची आहे
  5. तज्ज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे सुधारणा गरजेच्या
  6. सातत्याने युजरला येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात

कोणते अ‍ॅप कोणत्या स्थानी? किती वापर?

  1. पहिल्या स्थानी गुगल पे – 54 टक्के
  2. दुसऱ्या स्थानावर फोन पे –  11.9 टक्क्यांवर
  3. तिसऱ्या स्थानावर पेटीएम –  9.7 टक्के
  4. चौथ्या स्थानी – Bhim App : डिजिटल स्पर्धेत ‘भीम’ मागे, सरकार कमी पडले की वापरनं किचकट? जाणून घ्या…व्हॉट्सअ‍ॅप – 8.5 टक्के
  5. पाचव्या स्थानी – भीम अ‍ॅप
Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.