सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीममध्ये पैसे गुंतवण्याचे सहा फायदे, 16 जुलैपर्यंत संधी

Gold Bond | सोन्यात गुंतवणूक आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी सरकार वेळोवेळी सॉवरेन गोल्ड बाँडच्या सीरिज जारी करते. याअंतर्गत गुंतवणूकदारांना बाजारभावापेक्षा कमी किंमतीत सोने मिळते.

सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीममध्ये पैसे गुंतवण्याचे सहा फायदे, 16 जुलैपर्यंत संधी
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 14, 2021 | 12:43 PM

नवी दिल्ली: Sovereign Gold Bond Scheme चे सबस्क्रिप्शन सोमवारपासून ग्राहकांसाठी खुले झाले आहे. हे बाँडस सोन्यातील गुंतवणुकीचा अत्यंत सुरक्षित पर्याय मानला जातो. अगदी एक ग्रॅमपासूनही या बाँडसमध्ये गुंतवणूक करता येते. प्रत्यक्षात घरातील तिजोरी किंवा बँकेच्या लॉकरमध्ये सोने (Gold) ठेवण्याची जोखीम पत्कारण्यापेक्षा सॉवरेन गोल्ड बॉन्ड हा तुलनेत सुरक्षित पर्याय समजला जातो.

रिझर्व्ह बँकेने या सिरीजसाठी प्रतिग्रॅम इश्यू प्राईस 4,807 रुपये इतकी निश्चित केली आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये ऑनलाईन गुंतवणूक केल्यास तुम्हाला प्रतिग्रॅम सोन्यापाठी 50 रुपयांची सूट मिळेल. ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी गोल्‍ड बॉन्‍डचा भाव प्रतिग्रॅम 4757 इतका आहे. सध्या सोने-चांदीचा दर हा सामान्यांच्या आवाक्यापलीकडे गेला आहे. त्यामुळे सोने खरेदीचे (Gold) नाव काढले की अनेकांच्या पोटात गोळा येतो. मात्र, आता एका सरकारी योजनेच्या माध्यमातून सोनं स्वस्तात खरेदी करण्याची संधी चालून आली आहे.

सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीममध्ये पैसे गुंतवण्याचे सहा फायदे

1. सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुकदारांना वार्षिक 2.5 टक्के व्याज मिळते. प्रत्येक सहा महिन्यांनी तुम्हाला व्याजाची रक्क मिळते. 2. सॉवरेन गोल्ड बाँडमधील गुंतवणुकीवर कॅपिटल गेन टॅक्स आकारला जात नाही. 3. हे सोने सुरक्षित साठवून ठेवण्याची चिंता नसते. त्यामुळे जोखीम कमी होते. 4. कोणत्याही एक्स्चेंजवर सॉवरेन गोल्ड बाँड विकता येऊ शकतात.

5. कर्ज घेण्यासाठी सॉवरेन गोल्ड बाँडचा तारण म्हणून वापर करता येऊ शकतो.

6. प्रत्यक्ष सोन्याप्रमाणे जीएसटी किंवा मेकिंग चार्जेस लागत नाहीत.

वेळोवेळी योजनेत गुंतवणुकीची संधी

सोन्यात गुंतवणूक आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी सरकार वेळोवेळी सॉवरेन गोल्ड बाँडच्या सीरिज जारी करते. याअंतर्गत गुंतवणूकदारांना बाजारभावापेक्षा कमी किंमतीत सोने मिळते. तसेच त्यामध्ये सरकारकडून सुरक्षिततेची पूर्ण हमी दिली जाते. हा बाँड खरेदी करण्यासाठी ग्राहकांना केवायसीचे निकष बाजारपेठेतून सोने खरेदी करण्याप्रमाणेच असतील. सरकारची सॉवरेन गोल्ड बाँड ही योजना नोव्हेंबर 2015 मध्ये सुरू झाली.

गुंतवणूक कोण करु शकेल?

भारतात राहणारे नागरिक, हिंदू अविभाजित कुटुंबे, विश्वस्त, विद्यापीठे आणि सेवाभावी संस्था या गोल्ड बाँड योजनेत गुंतवणूक करु शकतात. या बाँडमध्ये किमान एक ग्रॅम गुंतवणूक केली जाऊ शकते. एखादी व्यक्ती किंवा हिंदू अविभाजित कुटुंब आर्थिक वर्षात या योजने अंतर्गत चार किलोपर्यंत गुंतवणूक करु शकते. ट्रस्टसारख्या संस्था आर्थिक वर्षात 20 किलोपर्यंत गुंतवणूक करु शकतात. सॉवरेन गोल्ड बाँड योजनेचा कालावधी आठ वर्षांचा आहे. नोव्हेंबर 2015 मध्ये ही योजना सुरु केली गेली.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.