AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPF च्या नियमांमध्ये मोठा बदल, आता नोकरदारांसाठी दोन पीएफ खाती असणार, जाणून घ्या का?

अधिसूचनेनुसार, विद्यमान भविष्य निधी खाती (PF Accounts) दोन स्वतंत्र खात्यांमध्ये विभागली जातील. पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजावरील कराची गणना करण्यासाठी स्वतंत्र पीएफ खाते उघडले जाईल.

EPF च्या नियमांमध्ये मोठा बदल, आता नोकरदारांसाठी दोन पीएफ खाती असणार, जाणून घ्या का?
भविष्य निर्वाह निधी
| Edited By: | Updated on: Sep 03, 2021 | 12:21 PM
Share

नवी दिल्ली: PF Account News Update: नोकरदार लोकांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (EPF) नियमांमध्ये मोठा बदल झालाय. जर एखाद्या व्यक्तीने ईपीएफमध्ये एका आर्थिक वर्षात 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त योगदान दिले असेल, तर त्याला 2021-22 या आर्थिक वर्षापासून दोन स्वतंत्र पीएफ खाती ठेवावी लागतील. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) यासंदर्भात अधिसूचनाही जारी केलीय.

आता तुम्हाला पीएफ खाते ठेवावे लागेल

अधिसूचनेनुसार, विद्यमान भविष्य निधी खाती (PF Accounts) दोन स्वतंत्र खात्यांमध्ये विभागली जातील. पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजावरील कराची गणना करण्यासाठी स्वतंत्र पीएफ खाते उघडले जाईल. सीबीडीटीच्या अधिसूचनेनुसार, 31 मार्च 2021 पर्यंत कोणत्याही योगदानावर कोणताही कर भरावा लागणार नाही, परंतु 2020-21 आर्थिक वर्षानंतर पीएफ खात्यांवर मिळणारे व्याज करपात्र असेल, ज्याची स्वतंत्र गणना केली जाणार आहे.

1 एप्रिल 2022 पासून नियम लागू

CBDT च्या मते, हे नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू होतील. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जर तुमच्या पीएफ खात्यात 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली असेल, तर तुम्हाला त्या अतिरिक्त रकमेवर मिळालेल्या व्याजावर कर भरावा लागेल. ही माहिती तुम्हाला पुढील वर्षीच्या आयकर विवरणपत्र भरतानाही सांगावी लागेल. जर एखाद्या व्यक्तीच्या खात्यात नियोक्त्याचे योगदान नसेल तर त्याच्यासाठी ही मर्यादा 5 लाख रुपये असेल.

खासगी-सरकारी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र मर्यादा

एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे दरवर्षी अडीच लाख रुपयांची ही मर्यादा फक्त खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नाही. जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर EPF आणि VPF मध्ये योगदानाची मर्यादा 2.5 लाखांऐवजी 5 लाख रुपये आहे. याचा अर्थ जर सरकारी कर्मचाऱ्याच्या ईपीएफ आणि व्हीपीएफ खात्यात वार्षिक पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली गेली तर त्यांना त्या अतिरिक्त रकमेवर कर भरावा लागेल.

संबंधित बातम्या

SBI Alert: ‘या’ ग्राहकांना बँकेत जाऊन करावे लागणार हे काम, अन्यथा…

सप्टेंबर महिन्यात ‘या’ 5 बँकांच्या FD मधल्या गुंतवणुकीवर दुप्पट फायदा, जाणून घ्या सर्वकाही

Big change in EPF rules, now there will be two PF accounts for employees, you know?

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.