AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI Alert: ‘या’ ग्राहकांना बँकेत जाऊन करावे लागणार हे काम, अन्यथा…

ते नियम न पाळल्यास बँक खाते निष्क्रिय करते, ज्यानंतर बँक खात्यातून कोणताही व्यवहार करू शकत नाही. उदाहरणार्थ, जर तुम्ही बँक खात्यातून विशिष्ट वेळेसाठी कोणताही व्यवहार करत नसाल तर बँक ते खाते बंद करते. यानंतर एका प्रक्रियेचे पालन केल्यानंतर ते पुन्हा सक्रिय करावे लागेल.

SBI Alert: 'या' ग्राहकांना बँकेत जाऊन करावे लागणार हे काम, अन्यथा...
SBI Alert
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Sep 03, 2021 | 11:39 AM
Share

नवी दिल्लीः भारतीय स्टेट बँक आपल्या ग्राहकांना अनेक सुविधा पुरवते आणि आता बँकिंगचे बहुतेक काम केवळ ऑनलाईन माध्यमातून पूर्ण होत आहे. परंतु यासोबतच बँकेचे अनेक नियम आहेत, जे ग्राहकांना पाळावे लागतात. ते नियम न पाळल्यास बँक खाते निष्क्रिय करते, ज्यानंतर बँक खात्यातून कोणताही व्यवहार करू शकत नाही. उदाहरणार्थ, जर तुम्ही बँक खात्यातून विशिष्ट वेळेसाठी कोणताही व्यवहार करत नसाल तर बँक ते खाते बंद करते. यानंतर एका प्रक्रियेचे पालन केल्यानंतर ते पुन्हा सक्रिय करावे लागेल.

तर तुम्ही तुमच्या खात्यातून कोणताही व्यवहार करू शकणार नाही

अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, तुमचे खाते कधी बंद होते आणि एकदा खाते निष्क्रिय झाले की, ते पुन्हा कसे सुरू करावे. जर तुम्ही या प्रक्रियेचे पालन केले नाही, तर तुम्ही तुमच्या खात्यातून कोणताही व्यवहार करू शकणार नाही. एसबीआयच्या या विशेष नियमांबद्दल जाणून घ्या, ज्याकडे प्रत्येक खातेधारकाने लक्ष देणे आवश्यक आहे.

खाते कधी निष्क्रिय होते?

आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर बचत किंवा चालू खात्यात दोन वर्षांपर्यंत कोणताही व्यवहार केला गेला नाही, तर त्याला ‘निष्क्रिय’ खात्याच्या श्रेणीत टाकले जाते. जर हे 10 वर्षे राहिले, म्हणजे समजा 10 वर्षे निष्क्रिय खात्यात कोणताही व्यवहार केला गेला नाही, तर त्यात जमा केलेले पैसे आणि त्याचे व्याज शिक्षण आणि जागृती निधीमध्ये हस्तांतरित केले जाते. मात्र, असे करण्याआधी बँक ग्राहकाला त्याची माहितीही देते.

खाते कसे सक्रिय करावे?

एसबीआयने सामायिक केलेल्या माहितीनुसार, खाते पुन्हा ऑपरेटिव्ह करण्यासाठी आपल्याला केवायसी अपडेट करावे लागेल म्हणजेच आपली सर्व केवायसी कागदपत्रे बँकेत जमा करा. याशिवाय ग्राहकाला बँकेत जाऊन डेबिट व्यवहारही करावा लागेल. हे लक्षात ठेवा की हा व्यवहार फक्त बँकेद्वारेच झाला पाहिजे. म्हणून बँकेकडून केवायसी दस्तऐवजासह बँक शाखेला भेट देण्याची विनंती करण्यात आली आहे आणि तुम्ही बँक शाखेशीही संपर्क साधू शकता.

सल्ला म्हणजे नेमका काय?

तुमच्याकडे किती खाती आहेत हे लक्षात ठेवा आणि त्यांच्यामध्ये काही व्यवहार नियमितपणे करत राहा. त्याच वेळी जर एखादे खाते तुमच्यासाठी अजिबात काम करत नसेल, तर बँकेत जा आणि ते बंद करा आणि निश्चितपणे बँक खात्यात नॉमिनीची माहिती अपडेट ठेवा.

संबंधित बातम्या

सप्टेंबर महिन्यात ‘या’ 5 बँकांच्या FD मधल्या गुंतवणुकीवर दुप्पट फायदा, जाणून घ्या सर्वकाही

पगार ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? ज्याद्वारे तुम्ही बँकेतून जास्त पैसे काढू शकता

sbi alert if you want to active your account then have to kyc update in bank branch

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान