SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी मोठी बातमी; आता क्रेडिट कार्डद्वारे EMI वर खरेदी करताय मग ही बातमी वाचा

| Updated on: Nov 16, 2021 | 11:12 PM

SBICPSL रिटेल आउटलेट्स व्यतिरिक्त Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स वेबसाईटवर केलेल्या सर्व EMI व्यवहारांसाठी प्रक्रिया शुल्क आकारेल. हे शुल्क खरेदीचे EMI मध्ये रूपांतर करण्यावर आकारण्यात येणाऱ्या व्याज शुल्काव्यतिरिक्त आहेत. कंपनीने आपल्या ग्राहकांना नवीन शुल्काबाबत ईमेलद्वारे माहिती दिलीय.

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी मोठी बातमी; आता क्रेडिट कार्डद्वारे EMI वर खरेदी करताय मग ही बातमी वाचा
नवीन वर्षात एटीएम पैसे काढण्यासाठी अधिक चार्ज द्यावा लागणार
Follow us on

नवी दिल्ली : तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. आता तुम्हाला एसबीआयच्या क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या ईएमआय व्यवहारांसाठी अधिक पैसे द्यावे लागतील. SBI कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (SBICPSL) ने जाहीर केले आहे की, EMI व्यवहारांसाठी कार्डधारकाला आता 99 रुपये प्रक्रिया शुल्क आणि त्यावर कर भरावा लागेल. हा नवा नियम 1 डिसेंबर 2021 पासून लागू होणार आहे.

प्रक्रिया शुल्क व्याज शुल्काव्यतिरिक्त भरावे लागेल?

SBICPSL रिटेल आउटलेट्स व्यतिरिक्त Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स वेबसाईटवर केलेल्या सर्व EMI व्यवहारांसाठी प्रक्रिया शुल्क आकारेल. हे शुल्क खरेदीचे EMI मध्ये रूपांतर करण्यावर आकारण्यात येणाऱ्या व्याज शुल्काव्यतिरिक्त आहेत. कंपनीने आपल्या ग्राहकांना नवीन शुल्काबाबत ईमेलद्वारे माहिती दिलीय.

प्रक्रिया शुल्काची माहिती कधी दिली जाणार?

EMI मध्ये यशस्वीरित्या रुपांतरित झालेल्या व्यवहारावर प्रक्रिया शुल्क लागू आहे. 1 डिसेंबर 2021 पूर्वी क्रेडिट कार्डद्वारे केलेले कोणतेही व्यवहार या प्रक्रिया शुल्कातून सूट देण्यात येतील. रिटेल आउटलेटवर खरेदी करताना कंपनी कार्डधारकांना ईएमआय व्यवहारांवरील प्रक्रिया शुल्काची माहिती चार्ज स्लिपद्वारे देईल.

व्यवहार रद्द झाल्यास शुल्क परत केले जाणार का?

ऑनलाइन ईएमआय व्यवहारांसाठी कंपनी पेमेंट पृष्ठावर प्रक्रिया शुल्काविषयी माहिती देईल. ईएमआय व्यवहार रद्द झाल्यास प्रक्रिया शुल्क परत केले जाईल. प्री-क्लोजरच्या बाबतीत ते परत केले जाणार नाही. EMI मध्ये रूपांतरित केलेल्या व्यवहारांसाठी रिवॉर्ड पॉइंट्स लागू होणार नाहीत.

SBI ATM वर ही पद्धत फॉलो करा

>>सर्वप्रथम YONO अॅपवर लॉगिन करा.
>> यानंतर होम पेजवर YONO Cash वर क्लिक करा.
>> आता YONO Cash मध्ये ATM विभागात क्लिक करा.
>> त्यानंतर रक्कम टाका.
>> आता 6 अंकी पिन बनवावा लागेल. यानंतर YONO रोख व्यवहार क्रमांक तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर येईल. ते 6 तासांसाठी वैध राहते.
>> ATM वर YONO कॅश पर्यायावर टॅप करा. यानंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवलेला YONO रोख व्यवहार क्रमांक आणि तुम्ही तयार केलेला 6 अंकी पिन टाकावा लागेल.
>> ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता तुम्ही रोख रक्कम जमा करू शकता.

संबंधित बातम्या

Fact Check : ATM वापरण्यापूर्वी दोनदा Cancel बटण दाबा, तुमचा पिन सुरक्षित राहणार का, जाणून घ्या?

गरज भासल्यास खात्यातील बॅलन्सपेक्षा जास्त पैसे काढू शकता, फायदा कसा घ्याल?