AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fact Check : ATM वापरण्यापूर्वी दोनदा Cancel बटण दाबा, तुमचा पिन सुरक्षित राहणार का, जाणून घ्या?

PIBFactCheck : PIB फॅक्ट चेकमध्ये हा दावा खोटा असल्याचे आढळून आलेय. असा कोणताही मेसेज आरबीआयने जारी केलेला नाही. या वृत्ताची चौकशी केली असता ही माहिती खोटी असून, ते आरबीआयने जारी केले नसल्याचे समोर आले.

Fact Check : ATM वापरण्यापूर्वी दोनदा Cancel बटण दाबा, तुमचा पिन सुरक्षित राहणार का, जाणून घ्या?
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Nov 13, 2021 | 6:56 PM
Share

नवी दिल्ली : आजच्या काळात 99 टक्के लोक पैशांच्या व्यवहारासाठी एटीएमचा वापर करतात. परंतु काही वेळा एटीएम काळजीपूर्वक न वापरल्याने ग्राहकाला नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे बँक आपल्या ग्राहकांना एटीएमशी संबंधित माहितीबाबत नेहमीच सावध करते. दरम्यान, सोशल मीडियावर (Social Media) एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात म्हटलेय की, व्यवहार करण्यापूर्वी एटीएमवर ‘cancel’ बटण दोनदा दाबल्यास पिन चोरीला प्रतिबंध करता येतो. हा दावा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) केल्याचे पोस्टमध्ये म्हटलेय.

असा कोणताही मेसेज आरबीआयने जारी केलेला नाही

PIB फॅक्ट चेकमध्ये हा दावा खोटा असल्याचे आढळून आलेय. असा कोणताही मेसेज आरबीआयने जारी केलेला नाही. या वृत्ताची चौकशी केली असता ही माहिती खोटी असून, ते आरबीआयने जारी केले नसल्याचे समोर आले. एटीएममधून पैसे काढताना एक अतिशय उपयुक्त टिप म्हणजे एटीएम मशिनमध्ये कार्ड टाकण्यापूर्वी ‘cancel’ बटण दोनदा दाबा, असा दावा व्हायरल झालेल्या बातम्यांमध्ये करण्यात आला. एखाद्याने तुमचा पिन कोड चोरण्यासाठी कीपॅड सेट केला असल्यास तो सेटअप रद्द होईल.

तुम्ही फोटो आणि बातम्यादेखील पाठवू शकता

पीआयबी फॅक्ट चेकची टीम सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा दाव्यांची सतत चौकशी करत असते. तुम्हालाही कोणत्याही बातम्या किंवा फोटोबद्दल शंका असल्यास तुम्ही +91 8799711259 वर WhatsApp किंवा socialmedia@pib.gov.in वर ईमेल करू शकता. याशिवाय तुम्ही ट्विटरवर @PIBFactCheck किंवा /PIBFactCheck Instagram वर किंवा /PIBFactCheck Facebook वर देखील संपर्क साधू शकता.

SBI कडून YONO खाते बंद करण्याचा मेसेज मिळाला, मग सावध राहा!

तुमचे YONO खाते बंद केले, असे सांगून तुम्हाला तुमच्या फोनवर SBI कडून मेसेज आला आहे का? तर आम्ही तुम्हाला सांगतोय की, हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) आपल्या ग्राहकांना असा कोणताही मेसेज पाठवलेला नाही. म्हणून जर तुम्हाला देखील हा मेसेज प्राप्त झाला असेल तर सावध व्हा. पीआयबी फॅक्ट चेकने ही माहिती दिलीय.

संबंधित बातम्या

गरज भासल्यास खात्यातील बॅलन्सपेक्षा जास्त पैसे काढू शकता, फायदा कसा घ्याल?

तुम्हाला मोबाईलवर LIC पॉलिसीशी संबंधित माहिती हवीय, अशा प्रकारे करा मोबाईल अपडेट

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं